सातारा

दांपत्यास मारहाणप्रकरणी शाहुनगरच्या सहा जणांवर गुन्हा

प्रवीण जाधव

सातारा : क्वॉरंटाईनचा शिक्का मारुन घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन गोडोली येथील एका दांपत्यास मारहाण करुन ऍट्रॉसिटीची धमकी देत मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वर्षा गायकवाड, वैभव गायकवाड, उषा गायकवाड, रामचंद्र गायकवाड तसेच उषा गायकवाड यांची आई व लहान बहिणीवर (रा. मंगळाई कॉलनी, शाहुनगर) हा गुन्हा दाखल झाला आहे. सहा ते दहा नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सविता बाळासाहेब फुले (रा. मंगळाई कॉलनी, शाहूनगर, गोडोली) यांनी वर्षा गायकवाड हिला क्वॉरंटाईनचा शिक्का मारुन घेण्यास सांगितले होते. याचा राग वर्षा गायकवाड हिच्या मनात होता. त्यावरून फुले व गायकवाड कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दरम्यान, गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी घराच्या भिंती आणि गेटच्या कारणावरुन सविता फुले यांना वारंवार शिवीगाळ केली, तसेच तुमच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करतो, अशी धमकी देवून दमदाटीही केली. 

पतीला मारहाण केली. माझे केस ओढून पोटात लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या वेळी उषा गायकवाड हिने गळ्यातील पावणेतीन तोळ्याचे मंगळसूत्र ओढून डाव्या हाताच्या करंगळीचे बोट मोडल्याचे सविता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT