सातारा

सातारा जिल्ह्यातील 'या' तालुक्यात पोलिसांनी वाजवला वऱ्हाडाचा 'बॅंड'

आयाज मुल्ला

वडूज : तडवळे (ता. खटाव) येथे एका लग्नात शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून जास्त गर्दी करत लग्न सोहळा साजरा करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. याबाबत त्या वऱ्हाडी मंडळीवर वडूज पोलिस ठाण्यात पोलिस पाटील संदीप खाडे यांनी गुन्हा दाखल केला आला आहे.
 
याबाबत वडूज पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तडवळे येथील खिंडवस्ती याठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात 70 ते 80 लोक उपस्थित होते. या लग्नासाठी 20 लोकांची परवानगी घेतली असल्याचे त्या लोकांनी सांगितले. मात्र, त्या ठिकाणी जास्त गर्दी असल्याने, तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केल्याने वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून व्यक्तिगत सुरक्षा धोक्‍यात येईल, असे कृत्य करून सार्वजनिक उपद्रव निर्माण होईल, अशी संसर्ग पसरवण्याची घातक कृती संबंधितांकडून झाली. 

सातारकरांनाे, यामुळेच लॉकडाउनचा निर्णय झाला; वाचा सविस्तर

यामुळे मोहन रघुनाथ माळवे (वय 45), निवृत्ती दगडू माळवे (वय 61), श्रीरंग रघुनाथ माळवे (वय 48), राहुल रघुनाथ खाडे (वय 34), मल्हारी शंकर साबळे (वय 65), काकासाहेब दत्तू साबळे (वय 55), विकास वसंतराव साबळे (वय 45), चंद्रकांत सखाराम खाडे (वय 50), सुनील धनंजय खाडे (वय 35), शरद आत्माराम खाडे (वय 35), पांडुरंग दिनकर पाटोळे (वय 55) राजेंद्र रंगराव हांगे (वय 45), नितीन आबाजी खाडे (वय 32), पंढरीनाथ बाबूराव खाडे (वय 52 सर्व रा. तडवळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : संजय शिंदे

चारचाकी वाहनात जवान क्वारंटाइन..!, कोरोनात घेतोय कुटुंबासह गावाची काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT