सातारा

कऱ्हाड : गुंड अभिनंदन झेंडेवरील हल्ल्याप्रकरणी अमीर शेखला अटक

हेमंत पवार

कऱ्हाड : शहरातील मध्यवर्ती भागातील चौकात पोलिस रेकॉर्डवरील गुंड अभिनंदन झेंडे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील अमीर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, संबंधिताच्या हद्दपारीसाठीची कार्यवाही पोलिसांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिली.
'या' शहरात भीषण आग; दहा लाखांचे नुकसान

पोलिसांची माहिती अशी ः पोलिस रेकॉर्डवरील गुंड अभिनंदन झेंडे हा शाहू चौकातील केशकर्तनालयात होता. त्याची माहिती संशयित आशिष अशोक पाडळकर (वय 33, रा. सनसिटी, मलकापूर), अनिकेत रमेश शेलार (वय 21, रा. शास्त्रीनगर, मलकापूर), इंद्रजित हणमंतराव पवार (वय 23, रा. लाहोटीनगर, मलकापूर), सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20, रा. कोयना वसाहत) यांना मिळाली. त्यावरून ते झेंडेवर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने कारमधून शाहू चौकात गेले. त्यांनी आणलेल्या गाडीत कोयता, विळा या हत्यारांसह दांडके होते. अभिनंदन झेंडे केशकर्तनालयातून बाहेर आल्यावर चारही संशयितांनी झेंडेसह त्याच्या मित्रांबरोबर वादावादी करून अभिनंदनच्या गळ्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याने तो वार चुकवला आणि तो, त्याचे मित्र केशकर्तनालय दुकानाचा दरवाजा लावून आत जाऊन लपून बसले. दरम्यानच्या कालावधीत अभिनंदन झेंडेच्या मित्रांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांना फोनवरून दिली. त्यांनी तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संशयितांना हत्यारासह ताब्यात घेतले. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अभिनंदन झेंडेवरील हल्ल्याचा डाव उधळण्यात यश आले. 

'यांच्याशी' झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केला घाेषित 

एक दाेन नव्हे तेरा पाेलिस कोरोनाबाधित झाल्याने एसपी तेजस्वी सातपुतेंनी उचलले हे पाऊल

दरम्यान, या प्रकरणात बाबा टोळीच्या अमीर शेख याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. पोलिस उपअधीक्षक गुरव यांच्या पथकाने शेख याला ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितावर कडक कारवाई करण्यात येत आहे. संबंधित शेख टोळीवर यापूर्वी खून, मारामारीसह इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी सांगितले. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT