सातारा

सत्कार सभारंभानंतर सरपंचांसह 15 जणांवर गुन्हा दाखल

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : कान्हरवाडी (ता. खटाव) येथे सरपंच व उपसरपंच निवड झाल्यानंतर बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून सत्कार सभारंभाचे आयोजन केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांसह 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
त्याबाबतची फिर्याद पोलिस अंमलदार योगेश सूर्यवंशी यांनी दिली. त्यानुसार कान्हरवाडीच्या सरपंच कांता चंद्रकांत येलमर, उपसरपंच महावीर शशिकांत जाधव, सदस्य संगीता वसंत जाधव यांच्यासह सतीश प्रभाकर येलमर, रामचंद्र सदाशिव येलमर, रामचंद्र महादेव येलमर, प्रदीप तात्यासाहेब येलमर, यशवंत बाबूराव येलमर, शशिकांत बाबा जाधव, बाळू शामराव येलमर, हणमंत रामचंद्र येलमर, शंकर आत्माराम येलमर, आनंदा नामदेव जाधव, विजय ऊर्फ विज्या सदाशिव जाधव, बाळू लक्ष्मण चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार रोखावा. यासाठी विविध स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीसह जिल्ह्यात विविध बाबतीत कडक निर्बंध घातले आहेत. जिल्ह्यात चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई असून, प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्‍यक व बंधनकारक केले आहे. मात्र, कान्हरवाडीत शुक्रवारी (ता. 27 ) सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्यानंतर ते आदेश पायदळी तुडवण्यात आले. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने कोणतीही पुरेशी खबदारी न घेता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी मायणी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अमंलदार बापूराव खांडेकर, योगेश सूर्यवंशी, नवनाथ शिरकुळे हे गस्त घालण्याच्या निमित्ताने कान्हरवाडी येथे गेले होते. तेव्हा त्यांनी सर्व संशयितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 269, 270 व 188 नुसार गुन्हा दाखल केला. 

पोलिस समान न्याय देतील का ? 

सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार सोहळ्याची छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यामधील काही जणांना कारवाईतून मोकळीक देत केवळ सर्वसामान्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवणार का? असा सवाल लोक करीत आहेत. 

अपहरणकर्त्यांनी सरपंच पतीस माळशिरस तालुक्यातील पेट्रोल पंपावर दिले साेडून

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

SCROLL FOR NEXT