Phaltan Rural Police Station esakal
सातारा

शपथविधीसाठी गर्दी जमविल्याप्रकरणी जैन ग्रुपच्या अध्यक्षांविरुध्द गुन्हा

फलटणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन पदाच्या शपथविधीसाठी गर्दी जमविल्याप्रकरणी फलटण येथील जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी (Dr. Suryakant Shantilal Doshi) यांच्याविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात (Phaltan Rural Police Station) गुन्हा नोंद झाला आहे.

डॉ. सूर्यकांत दोशी यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाचा व कार्यकारिणीचा शपथविधी समारोह घेतला होता.

या बाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की शनिवार ७ ऑगस्ट रोजी पिंप्रद (ता. फलटण) येथील राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल येथे दुपारी दीडच्या सुमारास जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्यावतीने डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी यांनी त्यांच्या अध्यक्ष पदाचा व कार्यकारिणीचा शपथविधी समारोह घेतला होता. या कार्यक्रमास जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष व सदस्य मिळून पस्तीस ते चाळीस लोक उपस्थित होते.

संबंधितांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुठलीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेतलेली नव्हती. या कार्यक्रमास बेकायदेशीरपणे लोकांची गर्दी जमा करुन सार्वजनिक ठिकाणी विषाणू संसर्ग व त्याचा प्रादुर्भाव पसरवून, व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात घातल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करुन कोविड संसर्ग साथ रोग पसरु शकतो, हे माहीत असतानाही मानवी जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंप्रदचे पोलिस पाटील सुनिल बोराटे यांनी फिर्याद दिली असून तपास पोलिस नाईक धराडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT