satara sakal
सातारा

सिव्हिलमध्ये केसपेपर पुन्हा ऑफलाइन

संगणकीकृत विभागातील प्रिंटर झाला खराब; रुग्णांच्या भेटीचे रेकॉर्ड मेन्टेन होणे बंद

- प्रवीण जाधव

सातारा : संगणकीकृत झालेल्या जिल्हा रुग्णालयातील केसपेपर विभागातील प्रिंटर खराब झाल्याने केसपेपर देण्याची प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या भेटीचे रेकॉर्ड मेन्टेन होत नसून केसपेपरच्या युनिकोडचे गणित पुन्हा बिघडले आहे. जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार व सल्ला घेण्यासाठी बहुतांश रुग्ण हे लांबून जिल्ह्याच्या विविध भागांतून येतात.

त्यामुळे रुग्णालयात आल्यावर त्यांना तातडीने केसपेपर उपलब्ध होणे आवश्‍यक असते. तरच ते वेळेत डॉक्‍टरांना दाखवणे, त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करणे व पुन्हा त्यांना दाखवून औषधे व सल्ला घेणे या पुढील बाबी करू शकतात. अन्यथा त्यांना सायंकाळ किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागायची. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी आता केसपेपर संगणकीकृत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी केसपेपर विभागात तीन संगणकांसह अन्य यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून नागरिकांना संगणकीकृत केसपेपर देण्यास सुरवात झाली होती. या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला केसपेपर क्रमांक मिळत होता. प्रत्येकाचा मिळालेला क्रमांक हा त्याला आयुष्यभरासाठी असणार होता.

त्यामुळे या क्रमांकाच्या आधारेही नागरिक आपला केसपेपर मिळवू शकणार होता. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले संगणक कमी होते. सुरवातीला नागरिकांची पूर्ण माहिती भरावी लागत असल्याने केसपेपरसाठी वेळ लागत होता. परंतु, नागरिकांची माहिती अपडेट झाल्यानंतर या यंत्रणेमुळे आधीपेक्षा जलद गतीने केसपेपर मिळणे शक्य होणार होते. त्यासाठी केसपेपर विभागातील संगणकांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता होती. मात्र, आजवर संख्या वाढली नाही.

दीड महिन्यातच योजनेचा बोजवारा

कोणतीही नवीन संकल्पना अंमलात आणताना योग्य सुविधा उभ्या करणे आवश्यक होते. परंतु, तसे न केल्याने अवघ्या दीड महिन्यातच संगणकीकृत केसपेपर योजनेचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांना तातडीने केसपेपर मिळण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT