सातारा

कार्पोरेट क्षेत्रातही चाफळच्या चूलवालेबाबांचे मार्केट

कृष्णात साळूंखे

चाफळ (जि. सातारा) ः पुण्यासारख्या कार्पोरेट शहरात 35 वर्षांपासून ग्रामीण भागातून चुलीची परंपरा कायम ठेवणारे येथील रामचंद्र हणबर यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून चुलीचा आलेला वारसा उच्चशिक्षित होऊनही पुण्यात त्यांनी कायम ठेवला. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतावर अथक ज्ञान प्राप्त करून त्यांनी पारंपरिक चूल ते सुधारित निर्धूर चुलीपर्यंतचा केलेला बदल कालानुरूप लोकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे श्री. हणबर यांची चूलवालेबाबा अशी ओळख निर्माण झाली आहे.

ग्रामीण व निमशहरी महिलांना स्वयंपाकघरात त्यांची चूल उपयोगी पडते आहे. वयाच्या 35 व्या वर्षांपासून त्यांनी चुलीच्या संशोधनात काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. 1982 पासून चुलीतील सुधारणा, प्रचार, प्रसाराचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना परंपरेने चुली करणारे कुंभारही चूलवालेबाबा म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची 'इस्त्रो'त चमक 

महिलाही त्यांना सतत भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी त्यांना काम करण्यास ऊर्जा देत राहिली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातही त्यावर चर्चा घडवली आहे. कुंभार व ग्रामीण महिलांमुळे चुलीतील संशोधक होऊन विदेशातही पोचले. राज्यातील अंगणवाडी सेविकांसह अन्य महिला त्यांना चूलवालेबाबा म्हणूनच ओळखतात. श्री. हणबर यांनी 35 वर्षे चुलीच्या संशोधनात काम केले. पारंपरिक चुलीपासून ते सुधारित निर्धूर लक्ष्मी चुलीचा अथक अभ्यास केला. त्यांनी असंख्य चुली तयार केल्या.

""कुंभारवाड्यात नवीन नमुन्याच्या पाच ते सहा चुली तयार करण्याचे काम सुरू होते. चुली देण्यास तेथे गेलाे. चुलींची बांधणी व सुबकता बघून खूप समाधान झाले. या नमुन्याला कुंभारणीचे लक्ष्मी नाव दिले. शासनाने मान्य केलेली सुधारित लक्ष्मी चूल प्रसारात आहे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतापासून स्वयंपाकघरात चुलीची निर्मिती करत त्या चुलींना काळानुरूप आधुनिकतेचा आकार देण्याचा प्रयत्न होतो आहे.'' 

-रामचंद्र हणबर-देशमुख 

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT