सातारा

खायला ना फिरायला, जुंपलंय फक्त अभ्यासाला! वेळापत्रकात हवाय बदल

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. मात्र, विनासुटी सलग अध्यापनाच्या तासिका होत आहेत. त्यामुळे पॉकेटमनी खर्च करून खाऊ खाण्यास व मैदानावर खेळण्यास मिळत नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ होत असल्याचे चित्र दृष्टीस येत आहे. शालेय वेळापत्रकात छोट्या व मोठ्या सुटीचे प्रयोजन करण्याची मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत. 

कोरोनाच्या उद्रेकामुळे मार्च 2020 च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा विळखा सैल होऊ लागल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठविण्यास सुरुवात केली. शिक्षण विभागानेही 23 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष सुरू केले. तर 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीअखेरचे वर्ग सुरू केले आहेत. वर्ग सुरू करताना शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. नेहमीप्रमाणे दिवसभर शाळा न भरवता केवळ इंग्रजी, गणित व विज्ञान या महत्त्वाच्या विषयांचे अध्यापन करावे. त्या कामकाजाच्या काळात कसलीही सामुदायिक सुटी देऊ नये. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेत विनासुटी होणाऱ्या सलग अध्यापनाच्या तासिकांमुळे विद्यार्थी कंटाळून जात आहेत. लहान वा मोठी सुटी नसल्याने विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर खेळण्यास जाता येत नाही. मैदानावर फिरत गप्पा मारता येत नाहीत.

शालेय परिसरातील दुकान, हॉटेलमध्ये पॉकेटमनी खर्चून मनसोक्त आवडीचा खाऊ खाता येत नाही. अशी अनेक बाजूने कोंडी होत असून, सातत्याने पालक व शिक्षकांकडून केवळ अभ्यास एके अभ्यासाचाच पाढा वाचला जात आहे. परिणामी, लॉकडाउनच्या काळात घरी राहून वारंवार खाण्या-पिण्याची सवय लागलेले शाळकरी अस्वस्थ होत आहेत. खायला ना फिरायला, जुंपले फक्त अभ्यासाला अशा प्रकारची भावना ठिकठिकाणचे विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. शासनाने विविध निर्बंध हटवून मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल करून शाळा पूर्ववत पूर्णवेळ सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व शिक्षक करीत आहे. पूर्णवेळ व छोट्या-मोठ्या सुटीसहित शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळून शिक्षणही आनंददायी होण्यास मदत होणार आहे. 


आठ-दहा महिने शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता दहावी बारावी बोर्ड परीक्षा तोंडावर आल्याने शाळा पूर्ण वेळ सुरू करणे गरजेचे आहे.
कृष्णदेव घाडगे, पालक व शिक्षक, मायणी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT