Illegal Liquor esakal
सातारा

मालगावात दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन लाखासह 108 बाटल्या, दुचाकी जप्त

मालगाव (ता. सातारा) येथील छाप्यात दारूच्या 108 बाटल्या व दुचाकी जप्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : उत्पादन शुल्क विभागाने चार अवैध दारूविक्री (Illegal Liquor) अड्ड्यांवर छापे टाकून चार जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून चार दुचाकीसह सुमारे दोन लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Charges Filed Against Four People For Selling Illegal Liquor Satara Crime News)

मालगाव (ता. सातारा) येथील छाप्यात दारूच्या 108 बाटल्या व दुचाकी जप्त केली गेली. याप्रकरणी धीरज प्रदीप कदम (रा. मालगाव, ता. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. खोलवडी (ता. सातारा) हद्दीत श्रीकांत सूर्यकांत जगताप (रा. खोलवडी) गोवा राज्यात विक्री करण्याची परवानगी असलेल्या 750 मिली दारूच्या 108 बाटल्या व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पांडे (ता. वाई) येथे तुषार सुरेश पवार याच्या ताब्यातून गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेल्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बामणोली तर्फ कुडाळ (ता. जावळी) येथे निखिल शंकर तरडे याच्या ताब्यातूनही 750 मिलीच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, रोहित माने, शांताराम डोईफोडे, संतोष निकम, सचिन खाडे, महेश मोहिते, नितीन जाधव, अजित रसाळ, जीवन शिर्के, सागर साबळे, नरेंद्र कलकुटगी हे या कारवाईत सहभागी होते.

Charges Filed Against Four People For Selling Illegal Liquor Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT