shivajiraje bhosale sakal
सातारा

छत्रपती घराण्यातील शिवाजीराजे भोसले यांचे निधन

सातारच्या छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे (वय) पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निधन झाले.

उमेश बांबरे

सातारच्या छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे (वय) पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निधन झाले.

सातारा - सातारच्या छत्रपती घराण्यातील श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे (वय) पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या वृषालीराजे भोसले व एक नातू असा परिवार आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे चुलते होत.

आज रात्री उशीरा त्यांचे पार्थिव साताऱ्यातील अदालतवाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. उद्या (बुधवारी) त्यांच्यावर राजघराण्याच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजघराण्याचे छत्रपती शाहू महाराज आणि राजमाता सुमित्राराजे भोसले यांचे छत्रपती शिवाजीराजे भोसले हे सुपूत्र होत. शिवाजीराजे यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ मध्ये झाला. साहित्य, कला, क्रिडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात त्यांचे भरिव योगदान होते. सलग सहा वर्षे ते साताऱ्याचे नगराध्यक्ष होते. १५ मे १९८५ ते १६ डिसेंबर १९९१ या कालावधी त्यांनी साताऱ्याचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवली होती. त्यांनी त्यावेळी समाजपयोगी विविध विकास कामे केली.

सातारच्या राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वैरत्व विकोपाला गेलेले असताना शिवाजीराजे भोसले यांनी त्यांच्यात मनोमिलन घडविले. त्यांना खेळाविषयी प्रचंड आकर्षण होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशचे ते राज्य उपाध्यक्ष होते. सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही त्यांचे योगदान होते. ते आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदीर करंजे यांचे कार्याध्यक्ष होते. शिवाजीराजे हे गेली ७५ वर्षे साताऱ्यातील अदालतवाडा येथे राहात होते. अदालत वाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून परिचित होता. आजही या वाड्यातून दिलेला शब्द तसेच आदेश सातारकर सन्मानपुर्वक स्वीकारतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT