सातारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह 'महाविकास'चे अर्धा डझन मंत्री उद्या कोयना धरणावर

विजय लाड

कोयनानगर (ता. सातारा) : कोयना धरण व कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी 10 डिसेंबरला मुख्यमंत्री व महाविकास आघाडी शासनाचे अर्धा डझन मंत्री कोयनानगर येथे येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोयनानगरी सज्ज झाली आहे. अनेक वर्षापासून डांबर न पडलेल्या रस्त्यावर प्रथमच डांबर पडून रस्ते चकाचक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रथमच कोयनानगरचा लुक बदलत आहे.

राज्याला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळवून देणारे व राज्यात हरितक्रांतीला चालना देणारे कोयना धरण व जलविद्युत आहे. दहा वर्षापासून कोयना धरण व कोयना प्रकल्प असुविधाचा सामना करत आहे. शासनाकडून या प्रकल्पाला सहकार्य नसल्यामुळे त्याला घरघर लागली आहे. अनेक बहुउद्देशीय कामे ठप्प असल्याने कोयना प्रकल्पाची अवस्था किल्लारी प्रकल्पासारखी झाली आहे. कोयना प्रकल्पात कर्मचारी व अधिकारी वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. कोयना प्रकल्पात निधीची चणचण भासत असल्याचे कारण पुढे करूत कोयनेत काम झाले नाही. त्यामुळे कोयना वसाहतीची दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्र्यासह मंत्री आदित्य ठाकरे अन्य मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नेहमीच निधीची चणचण भासणाऱ्या परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरु आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT