सातारा

कोरोना प्रभावित क्षेत्रात पाहणी दौरा करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना पडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा विसर

सचिन शिंदे

कऱ्हाड : कोरोनाने प्रभावीत झालेल्या भागात नक्की काय उपाययोजना करता येतील, याची माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. विविध उपाययोजना कशा राबवता येतील, याचाही चर्चा केली. दरम्यान पाहणी दाैरा सुरु असताना दुचाकीवर बसलेले दाेन्ही अधिकारी हे हेल्मेट विना हाेते.
जिल्ह्यातील कारसेवकांना अश्रू अनावर 

कऱ्हाड शहरात वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यावर निश्‍चित काय उपाययोजना करता येतील, याची माहिती घेण्यासाठी डाके यांनी शहरात फिरून पाहणी केली. कोरोनाच्या प्रभावीत भागात त्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांना सोबत घेऊन माहिती घेतली. भाजी मंडई, रविवार पेठ, गुरुवार पेठ, कसबा वाडा भागातही त्यांनी पाहणी केली. शहरात कोरोनाचा शिरकाव होतो आहे. कोरोनाग्रस्तांनी सव्वाशेचा टप्पा पार केलेला आहे. ती स्थिती पाहण्यासाठी डाके यांनी शहरात फिरतीवर भर दिला आहे. डाके त्यांनी कोरोनाच्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधत त्यांनाही मदत केली. डाके यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. विविध कामांची माहिती घेतली. कोविडसाठी होम आयसोलटची व्यवस्था करण्याची पालिकेची तयार सुरू आहे. त्याचीही माहिती श्री. डाके यांनी घेतली. पालिकेने 24 तास कोविड मदत कक्ष सुरू केला असून, त्याचे चांगले परिणाम निश्‍चित होत असतानाचा त्यांनी दुचाकीवरून मंडई परिसरात फेरफटका मारला. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. कोणी आणि काय काम करायचे याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्याची शहरात चर्चा आहे.

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती 

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 220 बाधितांची वाढ; सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात 

दरम्यान दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट परिधान करण्याचा आदेश नुकताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींसह नागरिकांनी हेल्मेटची अट रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मुख्याधिकारी रमकांत डाके आणि आराेग्य निरीक्षक मिलींद शिंदे यांनी काेराेना प्रभावित क्षेत्राचा दाैरा करताना दुचाकीचा उपयाेग केला. परंतु एकानेही हेल्मेट परिधान केले नव्हते. त्याचीही चर्चा परिसरात चांगलीच रंगली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT