सातारा

मुंढेत चिकुनगुनियाची साथ; घरोघरी सर्व्हे सुरू

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : मुंढे (ता. कऱ्हाड) येथे चिकुनगुनियाचे चार ते पाच रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसांपासून तेथे रुग्ण सापडत असल्याने गावात खळबळ उडाली आहे. सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तेथे आवश्‍यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
 
गावात तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाला थंडी वाजून ताप येत होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्याचा ताप काही कमी येत नव्हता. त्याचबरोबर त्याचे अंगदुखीही वाढली होती. त्यानंतर त्याची तपासणी करण्यात आल्यावर त्याचा चिकुनगुनिया असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन दिवसांत आणखी तीन ते चार जणांना तशीच लक्षणे आढळून आली. त्यामुळे पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आल्यावर त्यांनाही चिकुनगुनियाची लक्षणे असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्या परिसरात आरोग्य विभागाने तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, विस्तार अधिकारी कोळी, सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे, डॉ. सुनीता खरात, डॉ. साफिया मकानदार आरोग्य कर्मचारी दीपक घोरपडे, मदन वानखेडे, सुजाता गिरी यांनी तेथ भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका नीलम पुजारी, आशा लोंढे, संगीता जाधव, सुशीला सातपुते यांनी घरोघरी सर्व्हे सुरू केला आहे.

Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Restrictions: पुण्यात ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; १४ दिवस कलम ३७ लागू, कधीपासून आणि का? जाणून घ्या...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT