सातारा

मुलांनी पुस्तकांचे वाचन करावे : अनिल कदम

शशिकांत सोनवलकर

दुधेबावी (जि. सातारा) : मुलांचा बौद्धिक व भावनिक विकास वाचनाने होतो. यासाठी शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय पूरक बालसाहित्य व पुस्तकांचे वाचन मुलांनी करावे, यासाठी शिक्षक व पालकांनी पुढाकार घ्यावा. वाचनाने मन व मेंदू समृद्ध होतो, असे मत गिरवी केंद्रसमूहाचे केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी व्यक्त केले.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या प्रेरणेने व शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम होत आहे. फलटण तालुक्‍यात वाचन संस्कृती संवर्धन व वाचन चळवळ उपक्रमांतर्गत गिरवीतील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शालेय ग्रंथालय व वाचनालयातील पूरक बालवाचन साहित्य व पुस्तके शाळेतील मुलांना घरपोच योजनेचा प्रारंभ केंद्रप्रमुख अनिल कदम यांच्या हस्ते व मुख्याध्यापक दत्तात्रय सुतार, उपक्रमशील शिक्षक राजेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. कदम बोलत होते.

बापरे! विंगच्या शिवारात लोंबकळताहेत प्रवाहित वाहिन्या 
 
गिरवी केंद्र समूहातील दहा जिल्हा परिषद शाळांतील 552 मुलांना घरपोच पूरक वाचनासाठी बालवाचन साहित्य व पुस्तके देण्याचे नियोजन झाले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार करण्यात येत आहे. ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाबरोबर वाचन संस्कृती संवर्धन, निबंध लेखन, चित्रकला, भाषण, रांगोळी स्पर्धा, कार्यानुभव, प्रकल्प असे विविध उपक्रम सुरू आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT