Sunil Tatkare Ajit Pawar esakal
सातारा

Sunil Tatkare : 'महाराष्ट्रात अजित पवारांना मोठं पाठबळ, आगामी निवडणुकीत 100 टक्के सिद्ध होईल'

काही कपोलकल्पित कथा तयार करून आम्हाला निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेमंत पवार

रोहित पवारांवरील कारवाई आणि तपास यापूर्वीपासूनच सुरू झालेला आहे. रोहित पवार यांना आलेली नोटीस ही त्यांच्या कारखाना, संस्थेच्या संदर्भात आहे.

कऱ्हाड : काही कपोलकल्पित कथा तयार करून आम्हाला निष्कारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा अजून कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रात अजित पवारांना (Ajit Pawar) मोठ्या प्रमाणावर पाठबळ वाढत असून, हे आगामी निवडणुकीत १०० टक्के सिद्ध होईल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या दिवंगत पत्नी रजनीदेवी पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खासदार तटकरे यांनी आदरांजली वाहिली. त्‍यानंतर ते येथील विमानतळावर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘रोहित पवारांना (Rohit Pawar) ईडीची नोटीस देण्यामागे कोणतीही खेळी नाही. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमागे फार मोठ्या प्रमाणावर पाठबळ उभे राहिल्यानंतर केवळ संशय निर्माण करणे, आम्ही घेतलेल्या भूमिकेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणं, भारत सरकारच्या यंत्रणा अनेक वर्षे काम करीत आल्या आहेत.

आता आम्हाला बदनाम करण्यासाठी वक्तव्य होत आहेत. रोहित पवारांवरील कारवाई आणि तपास यापूर्वीपासूनच सुरू झालेला आहे.’’ रोहित पवार यांना आलेली नोटीस ही त्यांच्या कारखाना, संस्थेच्या संदर्भात आहे. त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाचा दुरान्वयाने संबंध नाही, असेही श्री. तटकरे यांनी स्‍पष्‍ट केले.

ते म्हणाले, ‘‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करून कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या ५० कोटी रुपयांत खरेदी केला होता. याप्रकरणी ईडीने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. सोमय्या यांच्या आरोपांनंतर ईडीने रोहित पवार यांच्या कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT