सातारा

प्रियजनांचे अंत्यदर्शन जगाच्या कानाकोपर्‍यातुन होण्यासाठी 'या' ट्रस्टचा पुढाकार

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : कुटुंबातील व्यक्ती असो, नाही तर नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती. सारेजण एकमेकाला प्रियच असतात. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे हे प्रत्येकजण आपले कर्तव्य समजतो. पण, या कोरोनाने असे काही केले आहे की, आता कोणाच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येईना. पण, आता साताऱ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने नागरिकांची ही अडचण दूर केली असून, तुम्ही जगात कोठेही असा तुम्हाला साताऱ्यातील अंत्यसंस्कारास ऑनलाइन उपस्थित राहता येणार आहे.
काळजाला भिडतेय स्मशानातील माया 

सध्या सर्वत्र कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. शासनाने संचारबंदी कडक केली आहे. विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक बंधने घातली आहेत. इतर गावाला, दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात सहज जाता येत नाही. अत्यंत निकडीचे कारण असेल तर जाण्यासाठी परवान्यांचे मोठे दिव्य पार पाडावे लागते. एवढेच नव्हे तर जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घडेना आणि अंत्यसंस्कारासही उपस्थित राहता येईनासे झाले आहे. त्यातच शासनाकडून अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यास केवळ 20 व्यक्तींना परवानगी दिली जात आहे. मात्र, आता साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्यास बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अंत्यसंस्कारास ऑनलाइन उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात 

अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...

फक्त एक कॉल करा... 

तुम्ही देशात नाहीतर परदेशात कोठेही असा, तुम्ही फक्त अंत्यसंस्कारापूर्वी दोन तास अंत्यसंस्काराचे दर्शन घडविण्यासाठी 9422603625 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. तुम्हाला ट्रस्टच्या वतीने अंत्यसंस्कार दर्शन लाइव्ह घडविले जाणार आहे. 


""लॉकडाउन, संचारबंदीमुळे आणि एकूणच कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भीतीने अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास नागरिकांना उपस्थित राहता येईनासे झाल्यामुळे ट्रस्टच्या वतीने अंत्यसंस्काराचे दर्शन ऑनलाइन घडविण्याची व्यवस्था केली आहे.'' 

- राजेंद्र चोरगे, संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT