Gautam Adani Green Energy esakal
सातारा

Gautam Adani : अदानींच्या 'त्या' प्रकल्पाला तारळे खोऱ्यातील नागरिकांचा कडाडून विरोध; काय आहे प्रकल्प, का होतोय विरोध?

कळंबे येथे १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रस्तावित आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हरकती मागवल्या होत्या.

सकाळ डिजिटल टीम

भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला.

तारळे : विभागातील कळंबे (ता. पाटण) येथील प्रस्तावित अदानी ग्रीन एनर्जीच्या (Gautam Adani Green Energy) वीजनिर्मिती प्रकल्पाला (Power Generation Project) तारळे खोऱ्यातील हजारो नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हात उंचावून कडाडून विरोध केला. आमच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने प्रसंगी रक्त सांडण्याचा निश्चयही करण्यात आला. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको, अशी भूमिका उपस्थित हजारो नागरिकांनी घेत या प्रकल्पाला एकमुखी विरोध केला.

कळंबे येथे १५०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रस्तावित आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हरकती मागवल्या होत्या. लोकांना पूर्णतः अंधारात ठेवून हा प्रकल्प रेटून नेला जात असल्याची जाणीव झाल्याने व याचे भविष्यातील स्थानिकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कृती समितीने जनतेच्या माध्यमातून उठाव केला. यासाठी महिनाभर समितीने परिश्रम घेतले होते. यामुळे या विरोधात हजारो हरकती दाखल झाल्या.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने (Pollution Control Board) आज कळंबे येथे जनसुनावणी आयोजित केली होती. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, किरण लोकरे, प्रशांत पवार, शिवाजी राऊत, अजित पाटील (चिखलीकर), सुशांत मोरे, अभिजित जाधव, ॲड. आत्माराम कांबळे, ॲड. सिद्धेश पवार, अॕड. चेतन कणसे, अॕड. सौरभ देशपांडे, तारळे विभागातील प्रमुख पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ, निसर्गप्रेमी व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंपनीच्या वतीने प्रोजेक्टरवर प्रकल्प वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली; पण सुरुवातीपासूनच प्रकल्पाचा चुकीचा सर्व्हे झाल्याचे सिद्ध होत गेले. अनेक बाबींचा विचारच या सर्व्हेमध्ये नसल्याचा ठपका अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. या जनसुनावणीसाठी वनविभाग, कृष्णा खोरेचे अधिकारी अनुपस्थित होते.

चुकीच्या सर्व्हेवर आक्षेप

वनजमीन, इकोसेन्सेटिव्ह झोन, पावसाळ्याचा सर्व्हे, गौणखनिज उत्खनन, पशुपक्षी, धरणातील माशांच्या प्रजाती, बाधित लोकसंख्येची आकडेवारी, परिसरातील पीक उत्पादन, धार्मिक स्थळांना धोका, काम करताना ब्लास्टिंगचे तारळी धरणाच्या भिंतीसह जलस्रोत व घरांचे नुकसान, भूकंपप्रवण क्षेत्र, हिंस्र प्राण्यांचे स्थलांतर, या प्रकल्पामुळे तयार होणारे दूषित पाणी, रोजगार निर्मिती, सीएसआर फंड यासह अनेक चुकीच्या सर्व्हेवर लोकांनी बोट ठेवत या सर्व्हेवर आक्षेप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT