सातारा

कोरेगावात स्वयंस्फूर्त बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यावश्‍यक सेवा वगळून सुरू झालेल्या सात दिवसांच्या स्वयंस्फूर्त बंदला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण शहरभर शुकशुकाट निर्माण झाला होता. दरम्यान, बुधवारी नव्याने आणखी सात बाधित आढळून आल्याने शहरातील बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी संघटनेच्या वतीने शहरात काही दिवसांसाठी लॉकडाउन सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. तसे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवावे लागेल, असे मुख्याधिकाऱ्यांनी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले होते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर यासंदर्भातील निर्णय प्रलंबित राहिला. दरम्यान, व्यापारी संघटनेची मागणी व जनरेट्यामुळे दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षा, उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत शहरामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळून सात दिवसांच्या स्वयंस्फूर्त बंदचा निर्णय झाला. त्यानुसार, बुधवारी पहिल्या दिवशी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

दरम्यान, मंगळवारी (ता. आठ) रात्री प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार तालुक्‍यातील 31 जण बाधित आढळून आले आहेत. त्यात कोरेगाव व रहिमतपूर प्रत्येकी सात, कुमठे व तारगाव प्रत्येकी तीन, बोरगाव येथील दोन आणि तडवळे, जळगाव, आसरे, पिंपोडे बुद्रुक, सुर्ली, वाठार किरोली, भोसे, जांब, आर्वी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयामध्ये सातारारोड येथील 72 वर्षे वयाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आता तालुक्‍यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या एक हजार 250 झाली असून, 27 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत उपचारानंतर 841 जण बरे झाले असून, 103 जणांवर उपचार सुरू असल्याचे आणि 275 जण गृहविलगीकरणामध्ये असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT