Satara Crime esakal
सातारा

Satara Crime : पाडेगावात 11 वीच्या विद्यार्थ्यानं संपवलं जीवन; वसतिगृहातील खिडकीला दोरी बांधली अन्..

Satara Crime : खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोणंद : पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता कनिष्ठ महाविद्यालयातील (Samata Junior College) इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्यांने वसतिगृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली. देवराज प्रशांत धोतरे (वय १६, रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाजूलाच मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात रूम नंबर एकमध्ये देवराज धोतरे राहात होता. खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोरउडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत विशाल विजय जाधव (रा. शास्त्री चौक लोणंद, ता. खंडाळा) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणंद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. लोणंद पोलिस ठाण्याचे (Lonand Police Station) पोलिस हवालदार श्री. भिसे हे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT