सातारा

..अखेर कास पठाराने घेतला मोकळा श्‍वास!

सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा श्वास मोकळा करत आहेत. घाटाई फाट्यापासून कास पठारापलीकडील पार्किंगपर्यंत तसेच ऐतिहासिक राजमार्ग, कुमुदिनी तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार बंद आहे. या वर्षी फुलांचा हंगाम सुरू नसला तरी बहुतांशी पर्यटक कास पठार परिसरात फिरण्यास येत असून पठारावरून ये-जा करतच आहेत. कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून पर्यटकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यापासून ते परावृत्त करत आहेत. दरम्यान, कास पठार रस्त्यावर गाडीतून उतरून जाळीच्या बाहेरून फुलांना पाहणारे पर्यटक निष्काळजीपणे वागताना दिसतात. 

प्रवास करताना गाडीतून बाहेर फेकलेला कचरा, पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, कागदी पाकिटे, अनेक प्रकारचे प्लॅस्टिक, दारू पिऊन रस्त्यावर फोडलेल्या काचेच्या बाटल्या असेच चित्र जागोजागी दिसत आहे. कास पठार परिसरात ठिकठिकाणी स्वच्छतेसंदर्भात सूचना फलक असतानाही काही पर्यटक बेजबाबदारपणा दाखवत असून ते पर्यावरणाला मारक असे वर्तन करताना दिसत आहेत. या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू नये, यासाठी कार्यकारी समितीचे कर्मचारी रोज सकाळी संपूर्ण पठारावर रस्त्याने चालत फिरून अशा प्रकारे काही पिशव्या, घनकचरा गोळा करत आहेत. 

कास पठार परिसरातील जैवविविधता जपणे, फुलांच्या हंगाम काळात पर्यटकांना मार्गदर्शन सुविधा पुरविणे, पठाराचे रक्षण करणे, अवैध शिकारी, वृक्षतोड आदींवर अंकुश ठेवणे, वणवा विझविणे आणि पठाराची स्वच्छता या पद्धतीचे काम कास पठार कार्यकारी समितीकडून होत आहे. काही विघ्नसंतोषी लोकांकडून अविवेकी कृत्य घडत आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती 

......................................................................

कास पठार परिसरात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता राखून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी सहकार्य करावे. कास पठार कार्यकारी समिती या परिसराच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. 

- बजरंग कदम, अध्यक्ष, कार्यकारी समिती 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT