Cleaning of 85 streams in Satara for safety of urban areas  sakal
सातारा

साताऱ्यातील ८५ ओढ्यांची सफाई

पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करण्‍याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

सातारा : आगामी पावसाळ्यात ओढ्या-नाल्‍यांतील पाणी नागरी वस्‍तीत शिरू नये, यासाठी शहर आणि परिसरातील डोंगररांगातून आलेल्‍या ८५ ओढ्यांची सफाई करण्‍याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी पालिकेचे जेसीबी, डंपर आणि कर्मचारी कार्यरत असून हे काम पुढील दोन आठवडे सुरू राहणार आहे. अजिंक्‍यतारा किल्‍ला, यवतेश्‍वर आणि पेढ्याचा भैरोबा डोंगराच्‍या पायथ्‍याला सातारा शहर वसले आहे. शहराच्‍या मध्य भागात किल्‍ला आणि डोंगररांगांतून आलेले ओढे असून दरवर्षी त्‍यातून डोंगररांगांत झालेल्‍या पावसाचे पाणी वाहून जाते.

त्यापैकी अनेक ओढ्यांमध्‍ये अतिक्रमणे झाली असून त्‍याचा फटका त्‍या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात बसतो. दरवर्षी गोडोली, शाहूपुरी येथील ओढे पावसाळ्यात तुंबून त्‍यातील पाणी आजूबाजूच्‍या घरांत, दुकानांत शिरण्‍याच्‍या घटना घडतात. दरवर्षीच्‍या या प्रश्‍नामुळे येथील नागरिकांना दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. हे टाळण्‍यासाठी सातारा पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने शहर आणि विस्‍तारित भागातील ओढ्यांची पाहणी केली. पाहणीत शहरातील विविध प्रभागातून जाणारे ६०, तर विस्‍तारित शाहूपुरी, शाहूनगर भागातून गेलेले २५ नैसर्गिक ओढे असल्‍याचे समोर आले. त्यानंतर आरोग्‍य विभागाने ओढे- नाल्‍यांबाबतचा आराखडा तयार करत आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍यास सुरुवात केली.

दरवर्षी पावसाळ्यात ज्‍या ठिकाणी ओढे तुंबतात, तो भाग आणि त्‍या ठिकाणच्‍या ओढ्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करण्‍याबरोबरच त्‍या ठिकणी जमा झालेला कचरा, गाळ काढण्‍याचे काम पालिकेने नुकतेच सुरू केले आहे. पावसाळापूर्व ओढे- नाले सफाईच्‍या कामासाठी पालिकेने स्‍वत:चा जेबीसी, डंपर, टिपर व इतर यंत्रणा वापरण्‍यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रभागानुसार ओढ्यांची सफाई करण्‍यात येत असून पहिल्‍या टप्‍प्‍यात शाहूपुरी तसेच शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ याठिकाणी हे काम गतीने सुरू आहे. त्यानंतर उर्वरित भागातील ओढे आणि नाल्‍यांच्‍या सफाईवर लक्ष केंद्रित करण्‍यात येणार आहे. पावसाळापूर्व सफाई होत असल्‍याने डोंगररांगांतून आलेल्‍या ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह मोकळा होऊन पावसाचे पाणी वाहून जाण्‍याच्‍या मार्गातील अडथळे दूर होण्‍यास मदत झाली आहे.

शहरातील नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज

शहराच्‍या लगत असणाऱ्या डोंगररांगांतून आलेल्‍या नैसर्गिक ओढे-नाल्‍यांमध्‍ये राडारोडा तसेच कचरा नागरिकांकडून टाकण्‍यात येतो. या राडारोडा आणि कचऱ्यामुळे पावसाळ्यात पाण्‍याच्‍या प्रवाहात अडचणी निर्माण होतात. याचा फटका परिसरातीला नागरिकांना बसतो. हे टाळण्‍यासाठी नागरिकांनी ओढे-नाल्‍ंयात कचरा तसेच राडारोडा टाकणे बंद करणे आवश्‍‍यक आहे, असे आवाहन पालिकेचे आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : 'नुकतेच स्थापन झालेल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत'- उद्योगपती रॉबर्ट वड्रा

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT