सातारा

जेथे वेचायची फुले तेथे वेचल्या बाटल्या!

सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : परळी खोऱ्यातील डोंगरमाथ्यावर निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घाटाईदेवी मंदिर परिसरामध्ये राजू भोसले मित्र समूह आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात जवळपास 30 पिशव्या कचरा, बाटल्या जमा करून परिसर कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यात आला. 

श्री घाटाईदेवी मंदिर परिसर निसर्गसंपदेने नटलेला आहे. एकीकडे तीर्थस्थळाचा विकास होत असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील देवीच्या वनराईमध्ये चुली पेटवून मटण, दारूच्या ओल्या पार्ट्यांना ऊत येऊन सुटीच्या दिवशी काही हुल्लडबाज याठिकाणी "ओपन बार' भरवत असल्याचे सर्रास चित्र दिसून येत आहे. जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच, पेटवलेल्या चुली, प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात दिसत होता. या तीर्थस्थळाचे महत्त्व, निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलून बेशिस्त, विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक, स्थानिकांतून करण्यात आली होती. 

या पार्श्वभूमीवर परिसराचे पावित्र्य राखले जावे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी सातपासून स्वतः राजू भोसले, त्यांचा भागातील मित्र समूह, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष, सदस्य, कर्मचारी, ट्रस्टचे विश्वस्त, घाटवण ग्रामस्थांनी श्री घाटाईदेवी परिसरातून असंख्य दारूच्या बाटल्या व घनकचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. दरम्यान, यापुढे परिसरात कचरा, तसेच पार्ट्या करताना कोणी आढळल्यास संबंधितांना तातडीने कटाक्षेने कचरा उचलण्यास लावणार असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली. 

परळी विभागातील श्री घाटाई मंदिराला "क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला असून, मागील आठवड्यामध्ये या परिसरात ओल्या पार्ट्या तसेच दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच पाहता परिसराचे विद्रुपीकरण होत असल्याचे निदर्शनास आले. परिसराचे पावित्र्य राखले जावे यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्वांनी परिसराचे पावित्र्य राखावे. ओल्या पार्ट्या करणाऱ्यांनी असे अविवेकी कृत्य न करण्याविषयीचे आवाहन राजू भोसले यांनी केले. 

सुप्रिया सुळेंनी करुन दाखवलं, आपणही पुढाकार घ्या! शिवेंद्रसिंहराजेंची साद

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT