Eknath Shinde sakal
सातारा

CM Eknath Shinde : घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही तर लोकात जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.

हेमंत पवार

पाटण - सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानाच मुख्यमंत्री बनन्याचा अधिकार आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलाला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

घरात बसून उंटावरून शेळ्या राखणारा मी मुख्यमंत्री नाही तर लोकात जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला. राज्याचा चिफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हूणन काम करत आहेअसे ते यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन व पाटण तालुक्यातील आठ गावांमधील दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पाचे शिद्रुकवाडी (धावडे) येथे भूमिपूजन झाले. त्यापसंगी ते बोलत होते.

सातारा जिल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उदयोग मंत्री उदय सामंत, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतरीरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT