Satara LokSabha Election esakal
सातारा

Satara Loksabha : CM शिंदेंचे समर्थक पुरुषोत्तम जाधवांनी वाढवलं उदयनराजेंचं टेन्शन; लोकसभेसाठी मागितली उमेदवारी

उदयनराजे माझे मित्र आहेत. लोकशाहीत संख्येला महत्व असून छत्रपती उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

हेमंत पवार

लोकसभेसाठी मी यापूर्वी दोनवेळा निवडणुका ताकदीने लढलो आहे. महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकेल असा मला आत्मविश्वास आहे.

कऱ्हाड : सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) मी इच्छुक असून दोनवेळा ताकदीने निवडणूक लढलो आहे. सातारची जागा ही शिवसेनेचीच (Shiv Sena) आहे. महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा मला आत्मविश्वास आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त करुन लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांचे टेन्शन वाढवलेय.

मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक पुरुषोत्तम जाधव (Purushottam Jadhav) हे कऱ्हाड (जि. सातारा) येथे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याने लोकसभेला कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे सांगून जाधव म्हणाले, लोकसभेसाठी मी यापूर्वी दोनवेळा निवडणुका ताकदीने लढलो आहे. महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकेल असा मला आत्मविश्वास आहे.

उदयनराजे माझे मित्र आहेत. लोकशाहीत संख्येला महत्व असून छत्रपती उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीतील सर्वजण त्याचा विचार करतील. सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्याला उमेदवारी मिळाली तर काय हरकत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासारखा खासदार झाला तर लोकांचे प्रश्न सुटतील. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून मला संधी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT