ginger planting season start now 
सातारा

आल्याच्या दरात दिलासादायक वाढ

अल्पदरवाढीने शेतकऱ्यांमध्ये भांडवली खर्च निघाल्याचे समाधान

विकास जाधव

काशीळ - कोरोनाच्या संसर्गानंतर आले पिकांत झालेल्या घसरणीने आले उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पिकांच्या दरात अल्पशी सुधारणा झाली आहे. आले पिकाच्या प्रति गाडीमागे (५०० किलो) सहा ते सात हजार दरात वाढ झाली आहे. सध्या प्रति गाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागला आहे.

आले पिकाच्या गेल्या चार ते पाच वर्षांपासून संकटाच्या गर्तेत सापडले होते. कोरोनाचा संसर्ग राहिल्याने दरात कायम घसरण, वाढलेल्या किडी, रोग व त्यामुळे वाढलेला भांडवली खर्च, यामुळे आले उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. त्यामुळे आल्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेले दोन वर्षांपासून प्रति गाडीस चार ते सहा हजार रुपयांवर दर गेले नव्हते. हा दर न परवडणारा व उत्पादन झालेली घट यामुळे काही शेतकऱ्यांनी आले न काढता तसेच जमिनीत ठेवले होते.

सध्या मात्र जून महिन्यापासून दरात अल्पशी वाढ होण्यास सुरवात झाली आहे. प्रति गाडीमागे सहा ते सात हजार रुपये दरात सुधारणा होऊन सध्या प्रति गाडीस १४ ते १६ हजार रुपये दर मिळू लागले आहे. सलग चार वर्षे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हा मिळत असलेला दर काही प्रमाणात दिलासादायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खते, औषधे यांच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने आल्याच्या भांडवलात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर कमी असल्याने आले पिकाची आर्थिक गणिते जुळत नव्हती. दरात झालेली सुधारणा झाल्याने किमान भांडवली खर्च निघू शकतो. मात्र, दर स्थिर राहण्याची आवश्‍यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

क्षेत्रात झाली घट...

तीन वर्षांत आले उत्पादक कमालीचा अडचणीत आल्याने नवीन आले लागवडीचा कल कमी झाला आहे. मिळणारा दर व उत्पादन याचा मेळ बसत नसल्याने किमान ३० ते ४० टक्के आले पिकाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या घटीमुळे आल्याचे उत्पादन कमी होणार आहे.

मागील तीन वर्षांत आले पिकाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, मागील महिन्यापासून आल्याची मागणी वाढू लागल्याने दरात वाढ होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रति गाडीस सरासरी १४ हजारांपासून १६ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

-अमित यादव, आले व्यापारी, सासपडे, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT