सातारा

धामणेरचे कोरोना सेंटर इतरांना प्रेरणादायी  : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

प्रशांत आगेडकर

रहिमतपूर (जि. सातारा) : गावपातळीवर कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन श्री मारुती देव सार्वजनिक ट्रस्ट व यशवंत ग्रामपंचायत धामणेर यांनी उभारलेले कोरोना केअर सेंटर इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. 

यशवंत ग्रामपंचायत धामणेर (ता. कोरेगाव) येथे श्री मारुती देव सार्वजनिक ट्रस्ट व यशवंत ग्रामपंचायत धामणेरच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गावपातळीवरील कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. जिल्हाधिकारी सिंह यांनी घरात होम आयसोलेशन होणे शक्‍य आहे, त्यांनी घरीच राहावे, असा सल्ला देत पर्यायी व्यवस्था नसणाऱ्यांनी कोरोना केअर सेंटरचा वापर करावा असे सुचवले. शहाजी क्षीरसागर यांनी शाळेत दहा बेडचे दोन ऑक्‍सिजन मशिनयुक्त कोरोना केअर सेंटर सुरू केले असून, त्यात गावातील डॉक्‍टर, नर्स, कम्पाउंडर बाधितांची काळजी घेणार आहेत. 

सेंटरमध्ये अल्पोपाहार व दैनंदिन वापराची साधने मोफत मिळणार असून, जेवणाची व्यवस्था कुटुंबीयांनी करावयाची आहे, असे सांगितले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष कर्नल प्रकाश पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तहसीलदार रोहिणी शिंदे, कोरेगावचे गटविकास अधिकारी अविनाश माने, कोरेगाव सहायक उपनिबंधक ए. आर. सुद्रिक, डॉ. पाटील, डॉ. शिंदे, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतीचे प्रशासक आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT