सातारा

कोरोना इफेक्ट : सातारा जिल्ह्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सातारा जिल्ह्यात या वर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाच्या जागा जास्त असल्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइन पद्धतीने करावेत, अशी सूचना सर्व शाळाप्रमुखांना, प्राचार्यांना शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिल्या आहेत. 
सातारा : दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरावे
 

कोरोनाच्या सावटामुळे प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकताच दहावीचा निकाल लागल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यामुळेच शिक्षण विभागाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशाबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळ, लिंक याची व्यवस्था करावी. जेथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्‍य होणार नाही तेथे सोशल डिस्टन्सिंग सांभाळून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशीही सूचना दिली आहे. दरम्यान अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच कळविले जाईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आठ किलोमीटर पायपीट करणाऱ्या लक्ष्मीचा शाळेत पहिला नंबर; सैन्यात जाण्याचे स्वप्न

लई भारी...साताऱ्यातील पठ्ठ्याने पाणीपुरी विकून मिळविले दहावीत यश

सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा

यंदा सातारा जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत 41 हजार 018 विद्यार्थी पास झाले आहेत. सातारा जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी 51 हजार 060 इतक्या जागा आहेत. त्यापैकी अनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 15460, वाणिज्य 7080, विज्ञान 11200, संयुक्त 3000 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 800 जागा आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 3360, वाणिज्य 1120, विज्ञान 3840, संयुक्त 240 तसेच व्यवसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 400 जागा आहेत. याबराेबरच स्वयंअर्थसायित्ता प्रकारात कला शाखेसाठी 240, वाणिज्य 880, विज्ञान 3040, संयुक्त 400 जागा आहेत. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT