सातारा

कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी घातक; वाईत कॉंग्रेसचा जोरदार हल्लाबोल

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय घातक असून या विधेयकाने सर्व शेतकरी संपणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून लाखो नोकरदार बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेस शेतकऱ्यांना संपू देणार नाही, असा इशारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी केला. 

वाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या विरोधात केलेल्या आंदोलनप्रसंगी डॉ. जाधव बोलत होते. या प्रसंगी जिल्हा कॉंग्रेस प्रभारी संजय बालगुडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, महिला कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंजिरी पानसे, तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रमोद अनपट, प्रदीप जायगुडे, तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, विलास पिसाळ उपस्थित होते. 

बाजार समितीच्या आवारात जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या शेती विधेयकाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये शेतकरी बैलगाडीतून सहभागी झाले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. विराज शिंदे म्हणाले, "लॉकडाउनमुळे युवकांना बेरोजगार करणारे भाजपचे सरकार आता शेतकऱ्यांना उपाशी मारणार आहे. कृषी विधेयक आणून त्यांच्या तोंडचा घास पळवण्याचे काम करीत आहे. श्री. बालगुडे यांचेही भाषण झाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT