सातारा

कष्टकऱ्यांच्या चळवळीचा नेता हरपला; बाळासाहेब बागवान यांचे निधऩ

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : सातारा जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. बाळासाहेब ऊर्फ शमशुद्दीन मकबुलभाई बागवान (वय 68) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्काने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे.
 
ऍड. बागवान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे प्रदेश प्रतिनिधी होते. खंडाळा तालुका पाणी पंचायतीचे अध्यक्ष, महाराणी सईबाई हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष, लोणंद हमाल पंचायतीचे अध्यक्ष, लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आदी संस्थांवर ते काम करत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
 
माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत समर्थक असणारे ऍड. बागवान कॉंग्रेसचे सच्चे लढाऊ नेते होते. त्यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द अत्यंत संघर्षमय अशी राहिली. दुष्काळी खंडाळा तालुक्‍याच्या जमिनीला पाणी मिळण्यासाठी त्यांची धडपड होती. हमालांच्या घामाला दाम मिळण्यासाठी त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली होती. खंडाळा तालुका व लोणंदच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.
 
पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भातील पाणी परिषदेच्या माध्यमातून नागनाथअण्णा नायकवडी, आर. आर. पाटील, गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने हिरिरीने काम केले. खंडाळा तालुक्‍यातील नीरा- देवघर व धोम- बलकवडीच्या पाण्यासाठी पाणी परिषदा व अनेकदा आंदोलने केली. कामगारांच्या प्रश्‍नासाठीही त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज (शनिवार) सकाळी नऊ वाजता अंतिम विधी करण्यात येणार आहेत अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली.  

पाेलिस दादांच्या धावपळीने मिळाला लाख माेलाचा आनंद; विद्या निंबाळकरांना आनंदाश्रु 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT