सातारा

CoronaUpdate : कऱ्हाड तालुक्‍याची स्थिती गंभीर; पृथ्वीराज चव्हाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

सचिन शिंदे

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्राच्या हॉलमध्ये कोविड केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी लेखी सूचना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कऱ्हाडला नवीन कोविड सेंटर उभे करण्यात यावे, असे सूचनेत स्पष्ट म्हटले आहे.
आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन
 
आमदार चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यासह कऱ्हाड तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे रॅपिड ऍन्टीजन टेस्टची संख्या वाढविल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन वाढणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी सध्या बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्‍यातील स्थिती गंभीर असून सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कऱ्हाडला 30 हून अधिक डॉक्‍टरांना कोरोना, नॉन कोविड रुग्णांवर उपचारही बिकट

पृथ्वीराज चव्हाणांनी सार्थ ठरवला विश्वास, कऱ्हाडातील रुग्णालये घेणार मोकळा श्वास!

त्यामुळे भविष्यातील संभाव्य स्थितीचा विचार करून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय केंद्रात नवीन कोविड केंद्र सुरू करण्यात यावे. वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी स्थानिक विकास निधीतून वापर करावा, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

काय ही कल्पकता! गणेशाच्या घरीच विसर्जनानंतर त्याच मातीत लावणार फुलझाड 

रो-रो फेरीबोटीचा आनंद सुरूच राहणार, प्रवाशांचा वाढताेय प्रतिसाद 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena पक्ष अन् धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेंपुढे काय पर्याय? भाजपमध्ये विलीन होणार?

Chamoli Tunnel Accident: १९ कामगारांना रात्रीतून बाहेर काढले; चमोलीतील बोगदा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदतकार्याची पाहणी

Pimpalgaon Joge Dam: धरण ९६ टक्के भरताच मेमाणे वस्तीत पाणी शिरले! २० कुटुंबांसह १०० ते १२५ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

SCROLL FOR NEXT