सातारा

काकांच्या आठवणींनी "राजविलास'ही गहिवरला; उंडाळेत अंत्यसंस्कार  

गिरीश चव्हाण

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती ताबा ठेवलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी गोडोली येथील "राजविलास' या निवासस्थानी गर्दी केली. या ठिकाणी जमलेल्यांनी साश्रुनयनांनी काकांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. डोळ्यातील अश्रूंमुळे काकांचे लाडके "राजविलास' निवासस्थानही गहिवरून गेले.
  
जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनून राहिलेल्या विलासकाकांचे गोडोली येथे "राजविलास' नावाचे निवासस्थान आहे. कऱ्हाडनंतर काकांची भेट घेण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून "राजविलास'वर यायचे. काकांच्या राजकीय वाटचालीचा साक्षीदार असलेले "राजविलास' निवासस्थान सर्वसामान्यांचा आधार बनून राहिले होते. काकांची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना काकांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात समजली आणि सर्वत्र शोककळा पसरली. हॉस्पिटलमधून सकाळी आठच्या सुमारास काकांचे पार्थिव "राजविलास' या निवासस्थानी आणण्यात आले. पार्थिव येण्यापूर्वीच त्याठिकाणी काकांवर प्रेम करणाऱ्या हजारोंनी गर्दी केली होती. जमलेल्यांनी पार्थिवाचे साश्रुनयनांनी दर्शन घेत काकांच्या स्मृतींना उजाळा दिला.

विलासकाका म्हणजे, ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील, प्रबाेधनाचा वारसा जपणारे नेतृत्व; मान्यवरांची भावना 
 
या ठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, राजमाता कल्पनाराजे भोसले, डॉ. अनिल पाटील, उपमहाराष्ट्र केसरी साहेबराव जाधव, प्रल्हाद चव्हाण, नंदाभाऊ जाधव, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, रफिक बागवान, राजन चिपळूणकर, माजी जिल्हा सरकारी वकील सदाशिव सानप, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी, ऍड. श्‍यामप्रसाद बेगमपुरे, ऍड. ताहीर मणेर, गुरुप्रसाद सारडा, प्रकाश गवळी, त्रिंबक ननावरे, नीलेश महाडिक यांच्यासह शेकडो नागरिकांनी काकांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना आदरांजली अर्पण केली. काकांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जमलेल्या हजारोंच्या डोळ्यातील अश्रू पाहून काकांच्या राजकीय कारकिर्दीचा साक्षीदार असणारा "राजविलास'सुध्दा गहिवरून गेला होता.

माणसं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते हाच विलासकाकांचा हाेता श्वास !

दरम्यान आज दुपारी तीनच्या सुमारास माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्यावर शासकीय इतमामात उंडाळे येथे अंत्यसंस्कार हाेतील अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT