सातारा

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे साता-यात निधन

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांचे आज (साेमवार) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी हाेते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात माेठी पाेकळी निर्माण झाली आहे.

पाटील हे कॉंग्रेसचे माजी आमदार, माजी मंत्री राहिले आहेत. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांचे उंडाळे हे मूळगाव. ते काका नावाने सुपरिचित हाेते. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. विलासराव पाटील यांनी 1962 मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते उंडाळे गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले. 1967 मध्ये दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले. 1980 ते कऱ्हाड दक्षिणमधून आमदार झाले. 2014 पर्यंत ते आमदार होते. 

याच कालावधीत त्यांनी रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सात वर्षापुर्वीपर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. ही बॅंक राज्यातील अग्रगण्य बॅंक म्हणून ओळखली जाते.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी! १,४५५ कोटींचे प्रकल्प, वाचा संपूर्ण यादी

Cricketer News: क्रिकेटपटूने दिली सोन्याची चेन... मात्र प्रेयसीने गहाण ठेवली; न्यायालयात पोहोचताच संपूर्ण कहाणी उलटली

खोटं रक्त आणि... असा शूट झाला 'सावळ्याची जणू सावली' मधला अमृताच्या अपघाताचा सीन; पाहा BTS व्हिडीओ

Satara News: साताऱ्यातील ‘कास’वर अवैध उत्खनन; तहसीलदारांची व्यावसायिकाला दंडाची नोटीस

Kolhapur Tourist Death : राधानगरीत Engineering महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा दूधगंगेत बुडून मृत्यू; कांबळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT