Congress Party esakal
सातारा

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस रस्त्यावर; कऱ्हाड उत्तरमध्ये मोदी सरकारचा निषेध

संतोष चव्हाण

उंब्रज (सातारा) : केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस (Petrol, Diesel And Gas) दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेनुसार कऱ्हाड उत्तर कॉंग्रेसच्या (Congress Party) वतीने उंब्रज- मसूर मार्गावरील वडोली भिकेश्वर येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा (Central Government) या वेळी निषेध करण्यात आला. (Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike At Umbraj Satara Marathi News)

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती भरमसाट वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला आहे.

कॉंग्रेसचे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या आंदोलनास प्रांतिक प्रतिनिधी अजितराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, विकास जाधव, प्रताप देशमुख, दुर्गेश मोहिते, मधुकर जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे, सज्जन यादव, अनिल मोहिते, किशोर गांधी, वसंतराव जाधव, यशवंत चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress Party Agitation

श्री. जाधव म्हणाले, ""केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. पेट्रोलने 100 रुपये लिटरचा टप्पा पार केला असून, डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर लोकांचे जगणे कठीण होईल.'' अजित पाटील म्हणाले, ""केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस प्रणीत युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवल्या. सामान्यांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली.'' कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या वेळी महागाई व इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.

Congress Party Agitation Against Petrol And Diesel Price Hike At Umbraj Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT