सातारा

मातृभाषा संवर्धन करणे ही काळाची गरज : जयप्रकाश माने

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : मातृभाषा संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जयप्रकाश माने यांनी केले. घोगाव येथील श्री बाळसिद्ध विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप समारंभ झाला. या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. माने बोलत होते. ओमशिवराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे संस्थापक संजय भावके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

श्री. माने म्हणाले, ""विद्यालयाचे अनोखे उपक्रम ग्रामस्थांना खूप भावतात. शाखाप्रमुख हणमंत सूर्यवंशी हे सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे सर्व विभागांला घवघवीत यश मिळत आहे. शाळा "आयएसओ', तसेच भविष्यकालीन आदर्श देशाची रत्ने घडविणारे दालन करण्याकामी सर्वतोपरी मदत करू.'' श्री. भावके यांनीही शाळेच्या "आयएसओ'साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. संस्था संचालक शंकर पाटील, मानाजी माने, ज्ञानेश भावके, मुख्याध्यापक हणमंत सूर्यवंशी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
दरम्यान, विद्यार्थ्यांनी नाटिका, एकांकी, एकपात्री प्रयोग, पोवाडा, भक्ती गीते, विनोद, चारोळ्या, कविता, शेरो-शायरी इत्यादी लोककला सादर केल्या. कार्यक्रमाचे नियोजन दिनकर आंबवडे यांनी केले. दोन तास विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. दिनकर आंबवडे यांनी सूत्रसंचालन केले. बालाजी मुंढे यांनी आभार मानले. गणेश तपासे, सचिन चव्हाण, रवींद्र पाटील, भीमराव भोसले यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी नियोजन केले. कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा अजब कारभार; महिलांसह विद्यार्थी त्रस्त

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT