Satara Lok Sabha Election NCP Sharad Pawar esakal
सातारा

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी'तील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; पाटणच्या आभार मेळाव्याला पुन्हा माजी खासदारांना डावलले

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला होता.

हेमंत पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील उमेदवाराला पराभूत करून भाजपच वरचढ ठरल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात आहे.

कऱ्हाड : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला होता. मात्र, त्‍यालाच सुरुंग लावण्यात भाजपला यश आले. राष्ट्रवादीला अंतर्गत धुसफुसीचा फटका बसला. पाटण येथे आयोजित पक्षाच्या आभार मेळाव्यात माजी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांना पुन्हा डावलल्‍याने साताऱ्याची जागा जाऊनही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत संघर्ष कायमच असल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.

लोकसभेला त्यांच्याच पक्षातील कऱ्हाड-पाटणच्या दोन माजी मंत्र्यांनी माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला. त्यामुळे पक्षाच्या कसोटीच्या काळातच पक्षात अस्वस्थता होती. त्यातच साताऱ्याची जागा म्हणजे खासदार पवार गटाचे नाक असल्याने तगडा उमेदवार देण्याचे आव्हान होते. हुकमी एक्क्याला विरोध झाल्याने त्यातून मार्ग काढण्याचे शिवधनुष्य पेलत खासदार पवारांनी आमदार शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) उमेदवारी दिली.

मात्र, साताऱ्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात भाजपला यश येऊन राष्ट्रवादीला अंतर्गत धुसफुसीचा फटका बसला. त्यातच उद्या (शनिवारी) पाटणला राष्ट्रवादीच्या आभार मेळाव्याचे आमदार शिंदेंच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. त्या मेळाव्यालाही माजी खासदार पाटील यांना निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे साताऱ्याची लोकसभेची जागा जाऊनही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत संघर्ष कायमच असल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे.

यावेळची लोकसभेची निवडणूक ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झाली. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट आमच्या पक्षाला मिळावे, यासाठी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून साताऱ्याचे तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे पक्षाच्या फाटाफुटीत यावेळचे तिकीट त्यांना मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत मजल मारण्याची संधी मिळेल, अशी स्थिती होती. खासदार पाटील यांनी तब्बल तीन वेळा खासदारकी आणि सहा वर्षे सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्यामुळे प्रशासनातला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

त्याचबरोबर सारंग पाटील यांनीही खासदारांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांतून गावागावांत संपर्क वाढवला होता. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी खासदार पवार गटाची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी खासदार पाटील आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचे, तर माजी मंत्री पाटणकर यांनी त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांचे नाव पुढे केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटापुढे उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून मोठा पेच निर्माण झाला.

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार पवार गटाचा कसोटीचा काळ असतानाही हे ट्विस्ट निर्माण झाल्याने साताऱ्याची जागा निवडून आणण्यासाठी तगडा उमेदवार देण्याचे आव्हान होते. मात्र, ते आव्हान खासदार पवार यांनी आमदार शिंदे यांना उमेदवारी देऊन पेलले. मात्र, साताऱ्याचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीत राखता आला नाही. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या पक्षाचा खासदार उदयनराजे भोसले यांच्या रूपाने निवडून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी झाले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे उद्या पाटणला आमदार शिंदेंच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षद ऊर्फ भानुप्रताप कदम, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्या मेळाव्याला पाटण तालुक्याचे सुपुत्र आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही खासदार पाटील यांना डावलण्यात आले आहे. त्यांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीतील पराजयानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस कायमच असल्याचे चित्र आहे.

पराभवानंतरही पहिले पाढे पंच्चावन्नच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील उमेदवाराला पराभूत करून भाजपच वरचढ ठरल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात आहे. यावेळी भाजप व मित्रपक्षांनी एकदिलाने काम करून पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या विचारांचा उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे यापुढील विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निकालाचा करिष्मा कायम दिसेल, या आशेवर भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादीचे पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT