सातारा

संसर्गाच्या काळात पैशापैक्षा माणुसकी ठरतीय श्रेष्ठ : डॉ. प्रवीण चव्हाण

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णसेवा व प्रयास सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम करत आहे. सोनोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे रुग्णांशी संपर्क येतो. सॅनिटायझर, मास्कचा वापर, तसेच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची ऑक्‍सिजन व तापमानाची तपासणी, सामाजिक अंतर आदी सर्व त्या दक्षता घेतल्या. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णाचा संपर्क आला होता. त्यावेळी स्वत:ची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, सात दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. नंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला थोडासा ताप, घसा खवखवणे, अंगदुखी असा त्रास जाणवू लागल्याने चाचणी केली तेव्हा आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर स्वत: तसेच पत्नी व दोन मुले असे घरामध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये होम क्वारंटाइन झालो. आपल्याबरोबरच कुटुंबीयांनाही सर्व ती काळजी घेण्यास सांगितले. 

होम क्वारंटाइन झाल्यानंतर औषधोपचार सुरू केले. वडूजमध्येही काही डॉक्‍टरांसह रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाटत होती. आता घाबरायचे नाही, कोरोनाशी लढा देतच यशस्वी व्हायचे, असा ठाम निश्‍चय केला. डॉ. बी. जे. काटकर, डॉ. सचिन साळुंखे (सातारा) तसेच अन्य डॉक्‍टर मित्रांनी मोलाचे सहकार्य केले. पहिल्यापासून धावणे, योगा, प्राणायाम आदी व्यायामांची आवड असल्याने अन्य काही आजार नव्हते. आपण घरात राहून योग्य ती काळजी घेऊन सकारात्मक विचार ठेवून निश्‍चित बरे होऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. याकाळात मोबाईल, पुस्तकेच सोबती होती. शिवाय छायाचित्रणाची आवड असल्यामुळे अनेक जुनी छायाचित्रे पुन्हा पुन्हा पाहण्यात मन रमविले. होम क्वारंटाइनच्या काळात अनेक मित्र तसेच रुग्णमित्रांचे फोन येत होते, माझ्या तब्येतीची विचारपूस करीत होते. त्यांची विचारपूसच मला मोठा धीर देत होती. पैशांपैक्षा आपण कमवलेल्या माणसांचाच मोठा आधार मिळत होता. 

मला मानसिक सक्षमीकरणासाठी ताकद मिळत होती. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबीयांनाही धीर दिला. योग्य तो आहार, उपचार, दक्षता घेतल्यास कोरोनावर आपण निश्‍चित मात करू शकतो, याचा स्वानुभव आला. त्यामुळे फोनवरून मित्रांनाही धीर देण्याचा प्रयत्न केला. जीवन सकारात्मक पद्धतीने जगण्याचा संदेश कोरोनाने दिला असे वाटते. या खडतर काळात आपण माणसांचा द्वेष न करता कोरोनाचा द्वेष केला पाहिजे, एकमेकांना मदतीची भावना कायम ठेवली पाहिजे. वडूजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये वडूज मेडिकल असोसिएशनने योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी डॉ. इनामदार यांचा कोविड सेंटरला मदत करण्याबाबत फोन आला. त्यावेळी मी स्वत: होम क्वारंटाइन असतानासुद्धा कोविड सेंटरला मदत करता आली, याचे मनस्वी समाधान वाटते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT