Corona esakal
सातारा

साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! जिल्ह्यात 24 तासात 43 जणांचा मृत्यू, तर 1588 बाधित

बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) सुरू असला, तरी कोरोना बाधितांची (Corona patient) संख्या वाढतच आहे. रूग्णवाढीचा आकडा झटक्यात हजाराच्या खाली येत आहे, तर अचानक दोन हजाराच्या वर उसळी घेत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 1588 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 43 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Officer) दिली. (Corona Test Positive Of 1588 Citizens In Satara District Today)

जिल्ह्यात लॉकडाउन सुरू असला, तरी कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 42 (7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), कोरेगांव 257 (14866), माण 129 (11813), महाबळेश्वर 22 (4099), पाटण 81 (7191), फलटण 108 (26860), सातारा 294 (36230), वाई 58 (11798) व इतर 9 (1088) असे आजअखेर एकूण 172085 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (171), कराड 7 (664), खंडाळा 2 (138), खटाव 0 (425), कोरेगांव 3 (328), माण 8 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 3 (160), फलटण 2 (258), सातारा 15 (1079), वाई 2 (309) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3801 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona patient

जिल्ह्यात 836 नागरिकांना आज डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 836 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने - 835039

  • एकूण बाधित - 172085

  • घरी सोडण्यात आलेले - 151225

  • मृत्यू - 3801

  • उपचारार्थ रुग्ण - 17055

Corona Test Positive Of 1588 Citizens In Satara District Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT