Corona esakal
सातारा

साताऱ्यात मृत्यूतांडव सुरुच! जिल्ह्यात आजअखेर 2828 जणांचा मृत्यू, तर 120824 जण बाधित

जिल्हा बंद अवस्थेत असूनही कोरोनाच्या आकड्यांची गती मंदावत नसल्याचे दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने जिल्ह्यात 15 एप्रिलपासून अंशत: लॉकडाऊन (Lockdown) सुरू झाला. नुकताच लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. 21 दिवस जिल्हा बंद अवस्थेत असूनही कोरोनाच्या आकड्यांची गती मंदावत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 2379 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 2379 Citizens In Satara District Satara News)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 102 (5760), कराड 270 (17761), खंडाळा 176 (7419), खटाव 216 (10436), कोरेगांव 228 (10186), माण 129 (7741), महाबळेश्वर 27 (3511), पाटण 143 (5063), फलटण 436 (15952), सातारा 446 (27286), वाई 176 (9031 ) व इतर 30 (670) असे आजअखेर एकूण 120824 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 0 (108), कराड 10 (495), खंडाळा 2 (94), खटाव 5 (289), कोरेगांव 2 (257), माण 4 (159), महाबळेश्वर 0 (36), पाटण 3 (128), फलटण 3 (206), सातारा 12 (826), वाई 3 (228) व इतर 0 असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1936 नागरिकांना आज डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या (आज संध्याकाळपर्यंत) 1936 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने - 592238

  • एकूण बाधित - 120804

  • घरी सोडण्यात आलेले - 96070

  • मृत्यू - 2828

  • उपचारार्थ रुग्ण - 21847

Corona Test Positive Of 2379 Citizens In Satara District Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT