Corona Vaccination esakal
सातारा

Coronavirus : साताऱ्यात आज लसीकरण राहणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण

आज साताऱ्यात केवळ 5 हजार लस उपलब्ध होणार असल्याने बहुतांश लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात आता लसीकरणाचे (Corona Vaccination) नियम बदलून टाकले गेले आहेत. कोव्हॅक्सिन तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येतेय, तर कोव्हिशिल्डचे लसीकरण जिल्ह्यातील काही भागात सुरु आहे. मात्र, आज साताऱ्यात केवळ 5 हजार लस उपलब्ध होणार असल्याने बहुतांश लसीकरण केंद्र (Vaccination Center) बंद राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे आज साताऱ्यातील काही केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या साताऱ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी लसीकरण वाढविण्याची मागणी केली आहे, त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत लसीकरण वाढविले जाईल, अशी ग्वाही दिलीय. मात्र, आज 5 हजार लस उपलब्ध असल्याने बहुतांश लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. (Corona Vaccination Center In Satara Will Be Closed Today)

जिल्ह्यात दिवसात 3314 रुग्ण बरे

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. जिल्ह्यात आज एक हजार 310 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 30 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तीन हजार 314 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र आहे.

जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मृत्यूंचे प्रमाण कमी होते. मात्र, मागील महिनाभरात बाधित व मृत्यूच्या संख्येने कहर केला आहे, तसेच अद्यापही मृत्यू सत्राची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे, तसेच बाधितांची संख्या सतत दीड ते दोन हजारांच्या टप्प्यात असून, कोरोनाची साखळी रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कमी वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज फलटण तालुक्‍यात सर्वाधिक 395 बाधित आढळले असून, सातारा व कऱ्हाड तालुक्‍यात सर्वाधिक अनुक्रमे 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात 935 रेमडेसिव्हिर मिळाले

कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. जिल्ह्यात आज 935 रेमडेसिव्हिर मिळाले असून, 75 रुग्णालयांना वाटप करण्यात आले आहे. रेमडेसिव्हिर उपलब्धतेचे प्रमाण वाढल्याने आयसीयू व ऑक्‍सिजन बेडच्या 40 टक्के प्रमाणात वाटप करण्यात आले आहे, तसेच आज जिल्ह्यात सर्वाधिक 86 रेमडेसिव्हिर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयाला देण्यात आले आहेत.

Corona Vaccination Center In Satara Will Be Closed Today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT