सातारा

आत्मविश्वासामुळेच कोरोनावर विजय : श्रीकांत पाटील

सुहास शिंदे

पुसेसावळी (जि. सातारा) : सातारा येथे मला व माझी पत्नी त्रिशलाला प्रतिभा हॉस्पिटलमध्ये आणले, तर एकही बेड शिल्लक नव्हता. आम्ही खूप घाबरलो होतो. अखेर तेथील डॉ. संजीव साठे यांनी स्वतः स्टोअर रूममध्ये आम्हा दोघांना दोन बेड तयार करून ऍडमिट करून घेतले. आमच्यावर उपचार सुरू केले. डॉक्‍टरांचे पाठबळ आणि मनात बरे होण्याची जिद्द ठेवल्याने आम्ही कोरोनावर मात करू शकलो असे येथील श्रीकांत पाटील यांनी नमूद केले. 

पाटील म्हणाले, एकेदिवशी अचानक माझा घसा दुखू लागल्यामुळे मनात शंका उत्पन्न झाली. एक दोन दिवस घरगुती उपाय करून पाहिले मात्र, फायदा झाला नाही. आहार कमी झाला. ताप वाढला. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. ठिगळे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर कोरोनाची रॅपिड टेस्ट केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यामध्ये कोठेही कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नव्हते. शेवटी सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा निर्णय घेतला. मोठा मुलगा शुभमने धैर्य दाखवून स्वतः गाडी चालवून मला दवाखान्यात आणले. तोपर्यंत कोरोनाची तीव्रता मला चांगलीच जाणवू लागली होती. दवाखान्यात गेल्यावर तेथील परिस्थिती पाहिल्यावर मात्र, गळीतगात्र झालो. एवढ्या मोठ्या दवाखान्यात एकही बेड शिल्लक नव्हते. मात्र, तेथील डॉ. संजीव साठे यांनी अखेर स्वतः स्टोअर रुममध्ये मला आणि माझ्या संपर्कात आलेली माझी पत्नी त्रिशला असे दोघांनाही दोन बेड तयार करून ऍडमिट करून घेतले आणि आमच्यावर उपचार सुरू केले. डॉ. साठे यांनी दाखवलेली सहकाऱ्याची भूमिका आणि त्यांच्या आत्मविश्वासाने मला चांगला दिलासा मिळाला.

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळेच घटना घडल्याचे स्पष्ट

पहिल्या दिवसापासूनच मला ऑक्‍सिजन लावावे लागले. दुसऱ्या दिवशी माझी पत्नी त्रिशला हिची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने माझ्या सुख दुःखात सहभागी असणारी पत्नी त्रिशला माझ्यासोबत होती. या काळात दोन्ही मुलांनी खंबीरपणे आम्हाला साथ दिली. उपचारासाठी लागणारे पैसे त्यांनीच जमा केले. गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी विचारपूस करायचे. मात्र, जवळ कोणीच येऊ शकत नव्हते याचे दुःख मनाला बोचत होते. सहा ते सात दिवसांनंतर माझ्या आणि पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. साठे यांनी दहा दिवसांच्या कालखंडात सुरवातीपासूनच सकारात्मकदृष्टीने आमच्यावरच नव्हे, तर हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांवर उपचार केले.

कायदा-सुव्यवस्थेसाठी आक्रमक भूमिका राहील : अजयकुमार बन्सल

प्रत्येकाची विचारपूस करणे, योगासने करायला लावणे व महत्त्वाचा भाग म्हणजे कोरोना रुग्णांना आत्मविश्वास देणे यामुळे आम्ही कोरोनावर विजय मिळवला. या काळात आलेले वाईट अनुभव मात्र गाठीशी राहिले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना झाल्यावर काय त्रास सहन करावा लागतो, याची कल्पना मला त्या दहा दिवसांत आली. सरकारने ग्रामीण भागातील लोकांना सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांत आयसीयू बेडची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत होऊ शकते. हा आजार सर्वसामान्य लोकांना खरोखर परवडणारा नाही हेच यातून मी स्पष्ट करेन.

पोलिस दाम्पत्याची जाबाज कामगिरी, कोरोनावर ठरली भारी!

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT