Corruption in cleaning campaign of Mahabaleshwar Municipality sakal
सातारा

महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्टाचार

अहवाल नगरविकास खात्याकडे

सकाळ वृत्तसेवा

भिलार - महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिवसेना युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरून माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी जिल्हाधिकारी यांच्यातर्फे नगरविकास खात्याला अहवाल पाठवला आहे.

नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील कोट्यवधींच्या टेंडरमध्ये कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करून मनमानी अवास्तव रकमा लावून टेंडर काढून कचरा डेपो, रंगरंगोटी, घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी, बाजार मूल्यापेक्षा जास्त, लेन्स कॅमेरा खरेदी, स्वच्छता अभियानात ॲडव्हर्टायझिंगकरिता दिलेले टेंडर घोटाळा, यतिराज बांधकाम कंपनीच्या बांधकाम ठेक्याबाबत, स्वच्छता जनजागृतीकरिता वापरलेल्या सामग्रीमध्ये नियमबाह्यता, सोशल मीडिया जनजागृतीमध्ये अवास्तव व भरमसाट बिलांची केलेली वाढ, बोगस कर्मचारी दाखवून बिल काढून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सचिन वागदरे यांनी केली होती.

दरम्यान, जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव यांना पाठवलेल्या अहवालात चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी अहवालात गंभीर बाबी नमूद केल्या आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेने खरेदी केलेल्या मशिनरी व साहित्य खरेदी नियमबाह्य व आर्थिक देयके देताना नियमबाह्यता अहवालात चौकशी अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.

मलनिस्सारण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचा निविदेमध्ये घोळ, नगरपालिकेचे नुकसान करून प्रदूषण कर व प्रवासी कराचा नियमबाह्य ठेका, यतिराज कन्स्ट्रक्शनला रंगरंगोटीसाठी दिलेला ठेका व यतिराज कन्स्ट्रक्शन कंपनीला काढलेली नियमबाह्य बिले अशा विविध मुद्द्यांवर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आल्याचे समजते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : पर्रिकर न सांगता फिरायचे तसे फिरा, पुण्यातील महिलेनं सल्ला देताच अजित पवार म्हणाले, कोण पर्रिकर? नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Heavy Rain: गेवराईत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस; नदी नाल्यांचा पाणी ओसांडून अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात

Kolhapur Crime : पहाटे चोरी करून रात्री थ्री स्टार हॉटेल मजा मारायची, लूटमारीचा चंगळवाद; CCTV मध्ये सापडताच पोलिसांनी केला कार्यक्रम

Mental Health: दर सात जणांपैकी एकाला मानसिक विकार; २०२१ मधील जगभरातील स्थिती, एक अब्ज जणांना त्रास, ‘डब्लूएचओ’ची माहिती

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

SCROLL FOR NEXT