सातारा

पाचवड पंचायतीतील बोगस पावत्यांच्या गैरव्यवहाराची पोलखोल; 'बीडीओं'चा 'सीईओं'ना अहवाल

विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : गतवर्षीच्या लॉकडाउनमध्ये (Lockdown) बोगस पावत्यांच्या माध्यमातून सरपंच अर्चना विसापुरे (Sarpanch Archana Visapure) यांनी अत्यावश्‍यक औषध दुकानदारांकडून दुकाने सुरू ठेवली म्हणून हजारो रुपयांचा दंड आकारून गैरव्यवहार (Corruption) केल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहाराची पोलखोल ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीवरून केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्याची शिफारस गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून केली आहे. (Corruption In Pachwad Gram Panchayat Satara Marathi News)

संबंधित व्यक्तींवर या गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्‍यक असतानाही तशी कायदेशीर कारवाई गटविकास अधिकारी यांनी केली नसल्याने पाचवड ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी संबंधितांवर फौजदारी होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आला होता. या कालावधीमध्ये अत्यावश्‍यक सेवा म्हणून औषध दुकानदारांना प्रशासनाने दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, औषध दुकानदारांकडून या कालावधीमध्ये दुकाने सुरू ठेवली म्हणून बोगस पावती पुस्तकाच्या आधारे हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच या दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत योग्यवेळी जमा केली गेली नाही. या गैरव्यवहाराची माहिती पाचवड ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून गटविकास अधिकारी यांच्यासमोर दोन फेब्रुवारी रोजी तक्रार स्वरूपात मांडली. या तक्रारीवरून व समोर आलेल्या माहितीवरून गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी या कायदेशीर कारवाईस बगल देत या प्रकरणी सर्व माहिती घेऊन संबंधित व्यक्ती या प्रकरणात दोषी आढळून येत असून तसेच पैशांची अफरातफर झाली असल्याचे नमूद करून त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39 (1) नुसार कारवाई करण्याची शिफारस करून पुढील कारवाई होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे.

Corruption In Pachwad Gram Panchayat Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT