सातारा

बाललैंगिक अत्याचार कायद्याचा बडगा; बुधवार पेठेतील युवकास सक्तमजुरी

प्रवीण जाधव

सातारा : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील एकाला विशेष अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी पोक्‍सो कायद्यानुसार सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

लक्ष्मण गोरख पिटेकर (वय 29, रा. बुधवार नाका झोपडपट्टी) 19 मे 2014 ला लक्ष्मणने एका अल्पवयीन मुलाला दुचाकीवरून करंजे हद्दीत नेले. तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. या प्रकाराबाबत कोणाला माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. दरम्यान याची माहिती संबंधित मुलाच्या नातेवाइकांना समजल्यानंतर लक्ष्मणवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

कुत्र्यांच्या भुंकण्याने पाटील कुटुंबिय जागे झाले, पाहतात तर काय ? बिबट्या दारात
 
पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या समोर खटल्याची सुनावणी झाली. त्यामध्ये फिर्यादी व पीडित मुलाचा, तसेच वैद्यकीय अहवालावरून डॉक्‍टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील अजित साबळे-कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश पटणी यांनी लक्ष्मणला बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार सात वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. शहरचे पोलिस निरीक्षक अण्णसाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी हवालदार अविनाश पवार, रवींद्र जाधव, क्रांती निकम यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्‍युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे यांनी सहकार्य केले. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT