सातारा

हाे हे शक्य झालंय; महाबळेश्वर तालुक्‍यात अर्ध्या तासातच अहवाल मिळताेय कोरोनाचा

रविकांत बेलोशे

भिलार (जि.सातारा)  : कोरोना अहवाल तत्काळ उपलब्ध होण्यासाठी महाबळेश्वर तालुक्‍यात जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीने ऍन्टीजेन टेस्ट सुविधा पाचगणी येथील बेल एअर हॉस्पिटलच्या कोरोना कक्ष केंद्रात सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून केवळ अर्ध्या तासात अहवाल मिळत असल्याने तत्काळ उपाययोजना करून संभाव्य संसर्ग टाळणे शक्‍य होणार आहे. सध्या महाबळेश्वर तालुक्‍यासाठी 100 किट देण्यात आली असून, आवश्‍यकतेनुसार अजून किटची मागणी करण्यात येईल, अशी माहिती बेल ऐअरचे संचालक फादर टॉमी यांनी दिली. महाबळेश्वर येथील कोरोना केअर सेंटरमध्येही या टेस्ट सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
केवळ 12 तासांत हजारोंची मदत!
 
पहिल्यांदा 44 टेस्ट किटद्वारे गोडवलीतील सहवासित लोकांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये चार लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बाधितांना पुढील उपचारासाठी कोरोना केंद्रात पाठवले आहे. दरम्यान, ऍन्टीजेन टेस्ट किटद्वारे लक्षणे असणाऱ्या व संभाव्य संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर त्यांचे अहवाल पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. सध्या संशयित रुग्णांची टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट येण्यासाठी बराच विलंब लागत होता. त्यामुळे मोठ्या अडचणी प्रशासनापुढे येत होत्या. या ऍन्टीजेन टेस्ट किटद्वारे आता अर्ध्या तासात जलदरीत्या रिपोर्ट येणार असल्याने बाधित रुग्णांना तातडीने सुविधा देण्यास मदत होणार आहे, असे तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांनी सांगितले.

भाविकांनाे...श्री क्षेत्र जरंडेश्वरला जाताय, हे वाचा

उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ
 
कोरोनाची ऍन्टीजेन टेस्ट सुविधेबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीना पाच पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. त्याद्वारे अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

November 1 New Rules : नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू; गॅस सिलिंडर, दूध, सीएनजी महागले, FASTag मध्येही बदल

Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला! कुठे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको, तर कुठे महिलांचे टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन

LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

Disclosure Day Movie Review : साय-फाय चित्रपट पाहताना विचारांना नवी दिशा; ‘डिस्क्लोजर डे’मधील चार कथांचा अनोखा प्रवास

SCROLL FOR NEXT