Police Bandobast Police Bandobast
सातारा

साता-यात औषध वगळता अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने 'लाॅक'

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोरोना बाधितांची वाढती संख्येचा विचार लक्षात घेऊन सातारा शहरातील मेडिकल दुकानांव्यतरिक्त अन्य अत्यावश्यक सेवांवर बंधने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा आणि शाहूपूरी ठाण्याच्या पाेलिस कर्मचा-यांनी शहरातील काही भागांमधील मुख्यतः चाैकांमधील दुकाने आज (शुक्रवार) बंद केली. यामध्ये माेती चाैका, शनिवार चाैक, शाहू चाैक आदी चाैकांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात गत 24 तासांत 1395 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबराेबरच 15 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाबराेबरच जिल्हा प्रशासन आणि पाेलिस दल यांच्यावतीने विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. शासन आदेशानूसार अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या किरणामाल दुकाने, मेडिकल, मिठाई, खाद्य पदार्थ, हाॅटेल आदींना नियमांच्या अधीन राहून व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याबराेबरच स्थानिक प्रशासनास बाजारपेठेसह अन्य वेगवेगळ्या परिसरात नागरिकांची गर्दी हाेत असेल तर तातडीने उपाययाेजना म्हणून संबंधित ठिकाणचे व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानूसार सातारा शहरातील माेती चाैक, शनिवार चाैक, शाहू चाैक, समर्थ मंदिर चाैक, राजवाडा आदी चाैकांमधील व्यावसायिकांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान 45 वर्षांवरील व्यापाऱ्यांनी कोरोनाची लस घ्यावी, दुकानात बसणा-या कामगारांची टेस्ट करून घ्यावी. ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील भाजीपाला, फळविक्रेते, दूध विक्रेते, चिकन- मटण, किराणा दुकानदारांनी लवकरात लवकर प्रमाणपत्र काढावे असेही सूचित करण्यात आले. ज्या व्यापाऱ्याकडे प्रमाणपत्र नाही त्याने दुकान उघडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आज (शुक्रवार) साता-यातील बाजारपेठेत फिरुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

सातारा शहरात कोरोना लसीकरण पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय, गाेडाेली प्राथमिक आराेग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात सुरु आहे. त्या ठिकाणी लस देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT