सातारा

चार महिन्यांनंतर 'या' शहरात कोरोनाचा शिरकाव

आयाज मुल्ला

वडूज (जि.सातारा) ः शहरात 70 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. प्रशासनाने परिसरातील 300 मीटर अंतराचा परिसर सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. शहरातील मुलाणवाडा, लोहारवाडा परिसरात रहिवासी असलेल्या 70 वर्षीय वयोवृद्धाचा काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथील नातेवाईकांशी संपर्क आला होता.
निवारा शेडमध्येच त्यांनी थाटले संसार

त्यानंतर मंगळवारी (ता. 7) त्यांना ताप, सर्दी, खोकला व धाप लागण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी त्यांचा घशातील स्त्रावाचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. काल सायंकाळी त्यांचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला. त्यानंतर याठिकाणी नायब तहसीलदार सिताकांत शिर्के, पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, नगराध्यक्ष सुनील गोडसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली माने, पोलिस निरीक्षक अशोक पाटील यांनी भेट दिली.
 
बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अन्य दहा जणांना मायणीच्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वॅब आठ दिवसांनी घेतला जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने मुलाणवाडा, लोहारवाडा, धान्य बाजार, नगरपंचायत कार्यालय परिसर, तसेच मुख्य बाजार पेठेतून धान्य बाजाराकडे येणारे लहान रस्ते बंद केले, तसेच बाधित रुग्णाच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून 300 मीटर अंतराचा परिसर सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत शहरात प्रथमच स्थानिक कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.

संपादन - संजय शिंदे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

SCROLL FOR NEXT