Satara 
सातारा

गांजेतील मृत व्यक्तीची पत्नीही बाधित, चिंता वाढली

सकाळ वृत्तसेवा

कास (जि. सातारा)  : गांजे (ता. जावळी) येथील शनिवारी (ता.13) अचानक मृत्यू झालेल्या क्वॉरंटाइन व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. त्यानंतर त्यांच्या निकटच्या सहवासातील त्यांची आई व पत्नीला विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मंगळवारी (ता.16) रात्री त्यांच्या पत्नीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने गांजेतील रुग्णसंख्या दोनवर पोचली. त्यापैकी पहिली व्यक्ती मृत झाली आहे. 

दरम्यान, बाधित महिलेचे निकट सहवासित तिघे असून, त्यांना सद्यःस्थितीत होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. पहिल्या मृत रुग्णाच्या संपर्कातील 15 जण व महिलेच्या संपर्कातील तिघे अशा 18 जणांना 20 जून रोजी स्वॅब टेस्टसाठी दाखल करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर भगवान मोहिते यांनी सांगितले. 

गांजे येथील मृत रुग्णाला कसलीही कोरोनाची लक्षणे जाणवली नव्हती. अचानक झटका आल्यासारखे होऊन दवाखान्याच्या वाटेवरच या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आता त्याच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने गांजे गावची चिंता वाढली आहे. गावातील हायरिस्कमधील एकूण व्यक्‍तींची संख्या 18 झाली असून, लो रिस्कमधील लोकांची संख्या 40 कडे गेली आहे. आता 18 जणांचे अहवाल कसे येणार यावर गांजे गावातील स्थिती लक्षात येणार आहे. 

आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांमार्फत रोज घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व कामासाठी सरपंच लक्ष्मी चिकणे, उपसरपंच दिनकर गायकवाड, ग्रामसेवक एस. के. माने, पोलिस पाटील ललिता चिकणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक चिकणे विशेष परिश्रम घेत आहेत. 

संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात 

सध्या संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने गावातील व्यवहार पूर्ण शांत आहेत. गावामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. भाजीपाला, औषधे, दूध आदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

SCROLL FOR NEXT