सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गेल्या सहा महिन्यांत बाधितांची संख्या 19 हजारांवर पोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण व मृत्यू वाढीचा वेग मागील 12 दिवसांमध्ये राहिला आहे. या कालावधीत तब्बल आठ हजार 335 रुग्ण वाढले, तर मृतांची संख्या 173 एवढी वाढली आहे. कोरोना रुग्ण व मृतांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 12 दिवसांवर आला आहे. या कालावधीत घेतलेल्या साडेआठ हजार नमुन्यांपैकी केवळ 200 जणांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यावरून संसर्गाची भयावहता समोर येते.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 हजारांवर पोचली आहे. आतापर्यंत 513 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजही जिल्ह्यातील साडेसात हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या दररोज 800 ते एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाबाधित व मृतांची संख्या वाढीचा आढावा घेतल्यावर कोरोना रुग्ण व बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण दुप्पट होण्याचा वेग अवघ्या 12 दिवसांवर आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. 24 मार्चपर्यंत कोरोनाचे केवळ दोनच रुग्ण होते, तर कोरोनाने एकही मृत्यू झाला नव्हता; परंतु गेल्या 24 तासांत तब्बल 25 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एवढी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. 24 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत रुग्णसंख्या 19 पर्यंत वाढली, तर दोघांचा मृत्यू झाला होता. जूनपासून कोरोना संसर्गाचा वेग वाढला. 24 जूनपर्यंत कोरोनाचे 880 रुग्ण बाधित निघाले होते, तर 41 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तीच संख्या 24 जुलैपर्यंत दोन हजार 852 वर, तर मृतांची संख्या 101 पर्यंत गेली होती. 24 ऑगस्ट ते पाच सप्टेंबरदरम्यान बाधित व मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली. या 12 दिवसांच्या कालावधीत रुग्णसंख्या आठ हजार 335 ने, तर मृतांची संख्या 173 ने वाढली आहे. त्यामुळे बाधित व मृत्यूचा दर केवळ 12 दिवसांमध्ये दुप्पट झाला आहे. कोरोनाबाधित व मृत्यूचा वेग दुप्पट होण्याचा आतापर्यंतचा हा सर्वात कमी कालावधी आहे.
राजेंच्या कार्याचे शंभर टक्के काैतुक तेव्हाच : राजेंद्र चोरगे
सध्या कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. दरराजे 800 ते एक हजार रुग्ण बाधित येत असल्याने त्यांच्या निकटच्या संपर्कातील संशयितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध होत नाहीत. ती उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी काळातील रुग्णवाढीचा विचार करणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून एकमेकांशी येणारा संपर्क टाळणे महत्त्वाचे बनले आहे.
शाळा झाल्या बंद; मग कसा उडाला गोंधळ...?
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या
तारीख | बाधित रुग्ण | मृत |
24 मार्च 2020 | 02 | 00 |
24 एप्रिल | 21 | 02 |
24 मे | 309 | 07 |
24 जून | 880 | 41 |
24 जुलै | 2852 | 101 |
24 ऑगस्ट | 10653 | 315 |
05 सप्टेंबर | 18988 | 515 |
सातारच्या हद्दवाढीबाबत उदयनराजेंची ही भावना; या नेत्याला दिले सर्व श्रेय!
कोरोना बाधित व मृत्यांची झालेली वाढ
महिना | रुग्ण वाढ | मृत्यू वाढ | नमुण्यांची संख्या |
24 मार्च ते 24 एप्रिल | 19 | 02 | 965 |
एप्रिल ते 24 मे | 288 | 05 | 3862 |
मे ते 24 जून | 571 | 34 | 4159 |
जून ते 24 जुलै | 1972 | 60 | 15914 |
जुलै ते 24 ऑगस्ट | 7801 | 86 | 16137 |
24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर | 8335 | 173 | 8509 |
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.