सातारा

CoronaUpdate : खराडे, शिंदेवाडी, शेणोली स्टेशन, डुईचीवाडी, कुसबुद्रुक, निढळ, कारंडवाडीतील आढळले बाधित

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारी 12 काेराेनाग्रस्त उपचारानंतर घरी परतले ताेच आज (गुरुवार) सकाळी सात जण कोरोना (कोविड 19 ) बाधित अहवाल आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच बुधवारी दोन वर्षांच्या मुलासह 15 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 571 झाली आहे. त्याचबरोबर एक बाधित व दोन संशयित अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा 24 झाला आहे. कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून पाच जणांसह 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात एकही रुग्ण वाढला नसला, तरी रात्री उशिरा 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा 571 झाला. बाधितांमध्ये कोरेगाव तालुक्‍यातील कठापुरातील ज्येष्ठ नागरिक, दोन महिला, जावळी तालुक्‍यातील वाहगावमधील पुरुष, काटवलीतील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्‍यातील वावदरेमधील 45 वर्षीय महिला, माणगाव-अतितमधील 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्‍यातील जांभेकरवाडीतील दोन वर्षीय बालक, दिवशी मारुलीमधील 29 वर्षीय पुरुष, नवसारीतील 55 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्‍यातील शिरवळमधील 55 वर्षीय महिला, माण तालुक्‍यातील दहिवडीतील 19 वर्षीय युवक, कऱ्हाड तालुक्‍यातील तुळसणमधील 62 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्‍यातील कोळकीतील 54 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करून आलेल्या दिवड (ता. माण) येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, तिची मुंबई तपासणी झाली असल्याने सातारा जिल्ह्याच्या यादीत तिचे नाव वाढलेले नाही.
 
कोरोनाच्या बळींची संख्याही बुधवारी एकाने वाढून 24 झाली. मुंबईवरून प्रवास करून आलेला कोळकीतील (ता. फलटण) 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तसेच दोन संशयितांचाही मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईवरून प्रवास करून आलेल्या वडूज (ता. खटाव) येथील 57 वर्षीय युवक व गुरसाळेतील (ता. खटाव) 75 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, तीन संशयितांचे मृत्यूनंतरचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले. त्यामध्ये बोपेगाव (ता. वाई) व गिरवीतील (ता. फलटण) ज्येष्ठ महिला व वेळे-कामथी (ता. सातारा) येथील 59 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 


दिवसभरात 12 रुग्णांना सोडले घरी
 
गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या 254 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्याचबरोबर 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यात कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून पाच, खावलीतील केंद्रातून चार व सह्याद्री हॉस्पिटलमधून तिघांना सोडले गेले.

सात रुगणांची वाढ

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानूसार आज (गुरुवार) सात रुग्णांची वाढ झाल्याचे आराेग्य विभागाच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे. यामध्ये कराड तालुक्यातील खराडे 15 वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय् महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड )ता.सातारा  येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

खासदार श्रीनिवास पाटलांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुखांना धाडले पत्र

जगापासून लपण्यासाठी गेली लॉजच्या आश्रयाला... आता न्यायालयात माराव्या लागणार जोडीने चकरा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT