सातारा

Video पाहा : तुमचे वय 45 पेक्षा जादा आहे? मग जाणून घ्या लसीकरणाच्या नाेंदणीची पध्दत

सिद्धार्थ लाटकर

सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार एक एप्रिलपासून सातारा जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोविडचे मोफत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
 
जिल्ह्यातील कोविड 19 अंतर्गत लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. आता एक एप्रिलपासून लसीकरण करण्यासाठी नागरिकांना https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करून नोंदणी करावी, तसेच ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्राचे ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 

सर्वधर्मसमभाव जोपासणारे कॉंग्रेसचे नेतृत्व हरपले

दरम्यान, सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असे 79 शासकीय व 10 खासगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड व फलटण, ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्‍वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगाव, ढेबेवाडी, पाटण, मिशन हॉस्पिटल वाई, तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (ठोसेघर, येवती (ता. कऱ्हाड) केरळ, मुरुड, सळवे, सणबूर, सोनवडे (ता. पाटण) ही ठिकाणे वगळून) कस्तुरबा रुग्णालय गोडोली व कऱ्हाड या शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी पाच या वेळेत कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे.
 


 ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का

नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ऍन्को लाईफ सेंटर तामजाईनगर, संजीवन हॉस्पिटल सातारा, कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड, शारदा हॉस्पिटल कऱ्हाड, गुजर मेमोरियल हॉस्पिटल कऱ्हाड, मानसी मेमोरियल हॉस्पिटल खंडाळा, पाटील हॉस्पिटल कोरेगाव, मंगलमूर्ती क्‍लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पिटल वाई या ठिकाणी 250 रुपयांना प्रती कोरोना लशीचा डोस देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा गड ढासळणार, प्रशांत किशोर विजयाच्या दिशेनं; भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत

DK Shivakumar Cabinet : डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री! पाहा, कोणत्या आमदारांचं उजळलं नशीब? शपथविधीची वेळही ठरली!

Team India New Coach: गौतम गंभीरच्या टीममध्ये मोठा बदल! श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी नव्या कोचची घोषणा

'त्यांना ओरडायचं ठरवलेलं, पण...' संजीव कुमारला शेवटचंही भेटू शकले नाहीत सचिन पिळगांवकर, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून दुपारी 3 वाजता मुठा नदीत 29,117 क्युसेक विसर्ग; पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT